Crime: ‘वॉच’ ठेवणारे सीसीटीव्हीच दुकानातून चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 12:11 IST2023-04-22T12:11:35+5:302023-04-22T12:11:53+5:30

Crime: चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या दुकानालाच टार्गेट केले व ४.२१ लाखांचे सीसीटीव्ही व इतर साहित्य चोरून नेले. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Crime: The CCTV that keeps the 'watch' was stolen from the shop | Crime: ‘वॉच’ ठेवणारे सीसीटीव्हीच दुकानातून चोरीला

Crime: ‘वॉच’ ठेवणारे सीसीटीव्हीच दुकानातून चोरीला

नागपूर : चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या दुकानालाच टार्गेट केले व ४.२१ लाखांचे सीसीटीव्ही व इतर साहित्य चोरून नेले. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नंदकिशोर शालिकराम तिवारी (४६) यांचे रजत प्लाझा कॉम्प्लेक्स, घाट रोड येथे कॉम्प्युटर, सीसीटीव्हीचे दुकान आहे. १९ एप्रिलला रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. अज्ञात चोरट्याने बनावट चावीने दुकानाचे कुलूप उघडले व सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर असा ४.२१ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तिवारी यांना दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे कळले. ही चोरी पाळतीवर असलेल्या किंवा परिचयातीलच व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Crime: The CCTV that keeps the 'watch' was stolen from the shop