शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 11:23 IST

पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली.

ठळक मुद्देआधी एक, नंतर तिघांवर आरोपजरीपटका पोलिसांकडून कारवाई

नागपूर : जरीपटक्यातील एका युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोन दिवसानंतर नवीन ट्वीस्ट आल्याने हे प्रकरण आता सामूहिक बलात्काराचे ठरले आहे. तक्रार करणाऱ्या युवतीचे वय १८ वर्षाला एक महिना कमी आहे. त्यामुळे या प्रकरणात पोक्सोही लावण्यात आला आहे.

युवती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून ती बुटीबोरीला अभ्यासासाठी मैत्रीणीसह रुम करून राहते. तिचे यश कांबळे सोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी त्यांच्या मधुर संबंधाचे अनेक फोटो, व्हिडिओही मोबाइलमध्ये साठवून ठेवले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १७ एप्रिलला यशने तिला आपल्या रुमवर बोलवले अन् तिच्याशी शरीरसंबंध जोडले. रविवारी, २४ नोव्हेंबरला यश पुन्हा तिच्या रुमवर बुटीबोरीला पोहचला अन् त्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. तो उलटसुलट बोलत असल्याने तिने आपल्या आईला फोन करून माहिती दिली. त्यानंतर ती नागपुरात आली. आईला तिने १७ एप्रिलला यश कांबळेने बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली.

‘त्यांनीही झडप घातली’

दरम्यान, सोमवारी तरुणीची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करवून घेतली. यावेळी १७ एप्रिलला यश कांबळेने बलात्कार केला तेव्हा त्याचे दोन मित्र बाजूच्या रुममध्ये लपून होते. त्यांनीही नंतर आपल्यावर झडप घालून बलात्कार केल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

जरीपटका ठाण्यात धावपळ

सामूहिक बलात्कारात हे प्रकरण मोडत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आली. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून जरीपटका ठाण्यात धावपळ वाढली. मंगळवारी नव्याने जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणात यशचे साथीदार रिशिल उर्फ चिकू आणि रक्षीत खोब्रागडे या दोन भावांविरुद्ध गुन्हा नोंदवून मंगळवारी रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामुळे जरीपटक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPOCSO Actपॉक्सो कायदाnagpurनागपूर