नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:26 IST2025-08-21T18:03:44+5:302025-08-21T18:26:57+5:30
नागपुरात एका सेक्स रॅकेटचा पर्दापाश झाला आहे. हे रॅकेट आई आणि मुलगा चालवत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली.

नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
Crime News : नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील गुन्हे शाखेने 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये आई आणि मुलगा दोघे मिळून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले.
या प्रकरणाची सुरुवात एका गुप्त माहितीने झाली. हुडकेश्वर लेआउटमधील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केला आणि ऑनलाइन चॅटद्वारे या रॅकेटशी संपर्क साधला. या भोषणात त्यांनी डील ठरवली. यावेळी त्या मुलाने १००० रुपये जास्त मागितले. ही रक्कम आरोपींपर्यंत पोहोचताच पोलिसांनी घरावर छापा टाकला. तिथे उपस्थित असलेल्या आई आणि मुलाला ताब्यात घेतले.
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन
आई आणि मुलगाच सेक्स रॅकेट चालवायचे
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आई आणि मुलाने दोघांनीही हे घर सहा महिन्यांपूर्वी भाड्याने घेतले होते. आरटीओ विभागाचे वैयक्तिक काम करण्याचे निमित्त होते, पण प्रत्यक्षात त्यांनी वेश्याव्यवसाय सुरू केला. छापेमारीदरम्यान पोलिसांनी एका २७ वर्षीय तरुणीची सुटका केली. ही मुलगी छत्तीसगडची रहिवासी होती. तिला पैशाचे आमिष दाखवून नागपूरला आणण्यात आले. त्या तरुणीला फसवून वेश्या व्यवसायात अडकवले.
श्रीमंत ग्राहकांपर्यंत ते पोहोचायचे
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आई आणि मुलगा खूप हुशारीने काम करायचे. ते फक्त श्रीमंत आणि प्रीमियम ग्राहकांना मेसेज करायचे. आधी मुलींचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवायचे. ग्राहक त्यांच्या पसंतीची मुलगी निवडायचे आणि नंतर आगाऊ रक्कम घेतली जायची. त्यानंतर, डिल ठरल्यानंतर मुलीला ग्राहकांकडे पोहोचवायचे. छाप्यादरम्यान, पोलिसांनी ९४,७०० रुपयांचे साहित्य जप्त केले, यामध्ये ६३,५०० रुपये रोख आणि ३१,००० रुपयांचे चार मोबाईल फोन होते.
पोलिसांनी सुटका केलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणीही केली. नागपूर पोलिस आयुक्तांनी सांगितले की 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत अशा अवैध धंद्यांना उखडून टाकले जाईल. हे पहिल्यांदाच घडले नाही, याआधी १४ ऑगस्ट रोजीही पोलिसांनी सीताबर्डी परिसरात एका हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तिथे 'लूक बुक बाय इनारा युनिसेक्स सलून'च्या नावाखाली अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून सूत्रधाराला अटक केली.