शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणास संरक्षण अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 8, 2016 02:38 IST

एका डॉक्टरने केलेल्या अतिक्रमणाला संरक्षण दिल्यावरून दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर. अग्रवाल यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून....

मनपा इतिहासातील पहिलीच घटना : फौजदारी तक्रारीची न्यायालयाने घेतली दखलनागपूर : एका डॉक्टरने केलेल्या अतिक्रमणाला संरक्षण दिल्यावरून दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर. अग्रवाल यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अंबाझरी पोलिसांनी मनपाच्या धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजेश शांताराम कराडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपाच्या अलीकडच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक आदेशामुळे जाणीवपूर्वक कर्तव्य न बजावणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्धही सामान्य माणूस न्यायालयाच्या माध्यमातून कारवाई करू शकतो, अशी नवी आशा पल्लवीत झाली आहे. राजेश कराडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम ३९७ - ए (२) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात तीन महिन्याहून अधिक शिक्षेचे आणि २० हजार रुपये दंडाचे प्रावधान आहे. गोकुळपेठ कॉर्पोरेशन मार्केट येथील रितेश राधेश्याम शर्मा यांनी दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीवरून न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. प्रकरण असे की, शंकरनगर वेस्ट हायकोर्टवर पॅनोरामा एमआरआय सेंटरची इमारत आहे. नियमांचे उल्लंघन करून हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. पार्किंगच्या जागेवर मोठा जनरेटर लावून ही जागा आणखी अरुंद करण्यात आलेली आहे. यावर डॉ. शिरीष धांदे यांना १४ मे २०१५ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत हे अतिक्रमण हटविण्यास फर्मावण्यात आले होते. कराडे यांनी अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती; परंतु अंमलबजावणी केली नव्हती. पुढे या अतिक्रमणाला संरक्षण दिले जात असल्याचे लक्षात येताच, रितेश शर्मा यांनी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली होती. यावर न्यायालयाने अंबाझरी पोलिसांना या अतिक्रमणाबाबत सविस्तर अहवाल मागविला होता. तो न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या अहवालावरून राजेश कराडेविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच, त्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तसेच राजेश कराडेविरुद्ध नोटीस जारी केली. न्यायालयात अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद चौरसिया यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)