शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

क्रिकेट सट्टयाची वसुली करणारा पीएसआय गजाआड, दोन बुकींनाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 11:33 PM

नागपुरात येऊन एका बुकीकडून क्रिकेट सट्टयाची थकित रोकड वसूल करू पाहणा-या चंद्रपूरच्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली.

नागपूर -  पिस्तुलासह नागपुरात येऊन एका बुकीकडून क्रिकेट सट्टयाची थकित रोकड वसूल करू पाहणा-या चंद्रपूरच्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. ज्याच्यासोबत तो वसुलीसाठी नागपुरात आला त्या चंद्रपूरातील दोन क्रिकेट बुकींनाही पोलिसांनी अटक केली. दिलीप लोखंडे असे पोलीस उपनिरीक्षकाचे तर रितिक मेश्राम आणि रोहित गुल्हाणे अशी अटक झालेल्या बुकींची नावे आहेत.मेश्राम आणि गुल्हाणे चंद्रपुरात क्रिकेट सट्टयाची खायवाडी करतात. खामल्यातील कन्हैया करमचंदानी याच्याकडे त्यांची आयपीएलच्या सट्टयाची १ लाख, २० हजारांची उधारी होती. ती देण्यासाठी करमचंदानी टाळाटाळ करीत असल्याने यापूर्वीही मेश्राम आणि गुल्हाणे नागपुरात आले होते. त्यांनी करमचंदानीला रक्कम मागितली असता त्याने त्यावेळी दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, ही मुदत संपूनही तो रक्कम देत नसल्याचे पाहून मेश्राम आणि गुल्हाणे या दोघांनी त्यांचा मित्र चंद्रपूर पोलीस दलातील उपनिरीक्षक दिलीप लोखंडे याला हाताशी धरले. त्याला उधारिची रक्कम वसूल करून देण्यासाठी पर्सेंटटेजही पक्के करण्यात आले. त्यानुसार, भाड्याची कार करून आरोपी मेश्राम आणि गुल्हाणे आणि पीएसआय लोखंडे रविवारी भल्या सकाळी नागपुरात आले. ते सरळ करमचंदानीच्या खामल्यातील घरी धडकले. काही अंतरावर लोखंडे चालकासह कारमध्ये थांबला. तर, मेश्राम आणि गुल्हाणे करमचंदानीच्या घरी गेले. त्यांनी आपली थकित रक्कम करमचंदानीला मागितली. एवढ्या सकाळी रक्कम देऊ शकत नाही, काही दिवस थांबावे लागेल, असे करमचंदानी म्हणाला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. यावेळी मेश्राम आणि गुल्हाणे यांनी त्याला भाईसे मिलले म्हणून कारजवळ आणले. आतमध्ये बसलेल्या पीएसआय लोखंडेने त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. तातडीने रक्कम देण्याची व्यवस्था कर, असेही बजावले. त्यावेळी करमचंदानीने दोन तासांची मुदत मागून आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.  असे अडकवले बुकींना दुपार, सायंकाळ झाली तरी करमचंदानी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आरोपींनी त्याला फोन करून धमकावले. शिवीगाळ करून उचलून नेण्याचीही धमकी दिली. त्यामुळे करमचंदानी याने आपल्या सहका-यांच्या मदतीने प्रतापनगर ठाण्यात तकार नोंदवली. ठाणेदार राजेंद्र पाठक यांनी लगेच आरोपींना पकडण्यासाठी धावपळ सुरू केली. एपीआय सचिन शिर्के त्यांच्या सहका-यांसह सापळा रचला. करमचंदानीने फोन करून आरोपींना प्रतापनगरात बोलविले आणि ते येताच पोलिसांनी त्यांना पकडले. लोखंडे याने आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला तसेच मेश्राम आणि गुल्हाणे या तिघांना अटक केली. ते दारूच्या नशेत टून्न होते, हे विशेष! 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPoliceपोलिसArrestअटक