शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही टिकून राहण्याचे श्रेय संविधानालाच

By admin | Updated: February 18, 2015 02:43 IST

विविध जातीधर्माच्या नागरिकांना एकसंघ करून देशाची सुरक्षा आणि अखंडता निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

नागपूर : विविध जातीधर्माच्या नागरिकांना एकसंघ करून देशाची सुरक्षा आणि अखंडता निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे आज लोकशाही टिकून असून याचे श्रेय बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानालाच जाते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.वंदना संघ, राईट थिंकर्स पब्लिकेशन अ‍ॅण्ड डाक्युमेन्टेशन प्रा.लिच्या वतीने संविधान सभा डिबेटस् या मराठी आवृत्तीच्या खंडाचे प्रकाशन वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. अध्यक्षस्थानी वासुदेव थूल होते. व्यासपीठावर देवीदास घोडेस्वार, भय्याजी खैरकर, प्राचार्य विठ्ठलराव खाडे, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मून, विठ्ठलराव डांगरे, जमुना डगावकर उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, संविधान तयार करताना काय चर्चा झाली याची माहिती संविधान सभा डिबेटस्मधून मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रासाठी मेहनत घेऊन संविधान आपल्यापुढे ठेवले. संविधान सभा डिबेटस् मराठीतून लोकांपर्यंत पोहोचले ही महत्त्वाची बाब आहे. संविधानातून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीच्या नागरिकांना सन्मान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. देवीदास घोडेस्वार यांनी देशात कुठेही समस्या निर्माण झाल्यास संविधानाची गरज पडत असल्याचे सांगितले. प्रा. अनिल काणेकर यांनी संविधान सभा डिबेटस्चे मराठी भाषांतरामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत जाणार असल्याचे सांगितले. भय्याजी खैरकर यांनी शासनाने परवानगी दिल्यास बाबासाहेबांचे अप्रकशित साहित्य प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वासुदेवराव थूल यांनी सरकारचा पैसा न घेता आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करायचे हे वंदना संघाचे तत्त्व असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संविधान सभा डिबेटस्साठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)