१५-१८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 17:16 IST2022-01-03T12:05:48+5:302022-01-03T17:16:40+5:30
१५-१८ वर्षवोयगटातील मुलांच्या मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे.

१५-१८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू
नागपूर : राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागपूर जिल्ह्यात सकाळी १० वाजतापासून १५ ते १८ या वयोगटातील किशोरवयीन मुलांना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी आलेली मुलं
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली असून याला आळा घालण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे.
नागपुरात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लसीकरणास पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाताना स्वत:चे आधार कार्ड आणि मोबाईल आवश्यक आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लस दिली जाईल.
लसीकरणासाठी पात्र नागपूर शहरातील सर्वांनीच सुरक्षेच्या दृष्टीने पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.