शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'जनसुनावणी रेकॉर्डिंग' नष्ट केल्याचा ठपका; विद्युत आयोगाच्या माजी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा दणका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:37 IST

जनसुनावणी रेकॉर्डिंग हटवणे गंभीर : उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसुनावण्यांचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग नष्ट केल्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आनंद कुलकर्णी, माजी सचिव अभिजित देशपांडे आणि माजी सदस्य आय. एम. बोहरी व मुकेश खुल्लर यांना संबंधित जनहित याचिकेमध्ये प्रतिवादी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंजूर केली. तसेच, या अधिकाऱ्यांना त्यांच्यावरील आरोपांवर चार आठवड्यांत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विद्युत आयोगाने जनसुनावण्यांचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची पद्धत बंद करण्यासाठी व आधीच्या जनसुनावण्यांचे रेकॉर्डिंग नष्ट करण्यासाठी ४ सप्टेंबर २०१८ रोजी ठराव पारित केला होता. तसेच, या रेकॉर्डिंग सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यास मनाई केली होती. त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असता १२ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायालयाने वादग्रस्त ठराव अमलात आणू नये, असा आदेश दिला. 

त्यानंतरही आयोगाने जनसुनावण्यांचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग नष्ट केले. परिणामी, वडपल्लीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याचिकेत प्रतिवादी करून घेण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायद्यातील कलम ८ व ९ अंतर्गत गुन्हा केला, असे वडपल्लीवार यांचे म्हणणे आहे. त्यांच्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

आयोगाची विनंती फेटाळलीभारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील कलम २१८ व विद्युत कायद्यातील कलम १६८ अनुसार सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही. त्यामुळे वडपल्लीवार यांचा अर्ज फेटाळून लावा, अशी विनंती आयोगाचे वकील वरिष्ठ अॅड. एस. व्ही. रुंगठा यांनी केली होती. न्यायालयाने ही विनंती फेटाळली. केवळ प्रतिवादी केल्यामुळे या अधिकाऱ्यांनी कोणता गुन्हा केला किंवा ते कारवाईस पात्र आहे, असे होत नाही. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे न्यायालय म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय