शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने मान्य केले, सरकार कधी मानणार? गोवारी समाजाचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:57 IST

११४ गोवारी बांधवाच्या बलिदानाची दखल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. गोवारी हेच आदिवासी आहेत, त्यांचे आदिवासीत्व कुणीही नाकारू शकत नाही, ते आदिवासीच्या सवलती घेण्यास पात्र आहेत, असा निर्णय १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला. शहीद गोवारी स्मृती दिनाला आज २४ वर्षे होत आहेत. न्यायालयाने त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. आता फक्त शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाच्या संघर्षाला विराम द्यावा, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे२४ व्या वर्षी मिळणार का विराम ? 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ११४ गोवारी बांधवाच्या बलिदानाची दखल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. गोवारी हेच आदिवासी आहेत, त्यांचे आदिवासीत्व कुणीही नाकारू शकत नाही, ते आदिवासीच्या सवलती घेण्यास पात्र आहेत, असा निर्णय १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला. शहीद गोवारी स्मृती दिनाला आज २४ वर्षे होत आहेत. न्यायालयाने त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. आता फक्त शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाच्या संघर्षाला विराम द्यावा, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.२४ एप्रिल १९८४ चा जी. आर. रद्द करून ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोर्चाला भेट द्यावी, अशी मागणी मोर्चेक ऱ्यांची होती. मोर्चा त्यासाठी अडून बसला होता. मोर्चेकºयांचा संताप वाढत होता, अशात पोलिसांकडून लाठीमार सुरू झाला. हवेत फायरिंग झाली. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. तेव्हापासून गोवारी समाजाच लोकशाहीच्या विविध आयुधाच्या माध्यमातून शासनाशी संघर्ष करीत आहे. २००८ मध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तब्बल १० वर्षानी न्यायालयाने यावर निर्णय दिला. शासनाने २३ नोव्हेंबर १९९४ च्या घटनेनंतर गोवारी समाजाला एसबीसीमध्ये २ टक्के आरक्षण दिले पण त्यातही ३९ उच्च जातींचा समावेश केल्याने गोवारीला त्याला फायदा झाला नाही. शासनाने झिरो माईल चौकात गोवारी शहीद स्मारक उभारले. नागपूरच्या उड्डाणपुलाला शहीद गोवारी उड्डाणपूल असे नाव देण्यात आले. मात्र गोवारी समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे म्हणून आपला संघर्ष सुरूच ठेवला. दरम्यान या २४ वर्षात राज्यात दोन्ही महत्त्वपूर्ण राजकीय पक्षाचे सरकार आले. प्रत्येक सरकारने गोवारींच्या प्रश्नाला बगल दिली. अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे गोवारींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.न्यायालयाने गोवारी हे आदिवासी असल्याचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाने आमचे अस्तित्व मान्य केले आहे. आता फक्त मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून तसा जी.आर. काढल्यास गोवारींच्या २४ वर्षाच्या संघर्षाला विराम मिळेल.कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटन.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीnagpurनागपूर