सराफांच्या दुकानात हातचलाखी करणारी साथीदारासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 15:19 IST2021-11-10T15:17:57+5:302021-11-10T15:19:20+5:30

दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफा दुकानातून हातचलाखीने दागिने पळवणाऱ्या उच्चशिक्षीत महिलेला तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख, १५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

couple arrested for theft gold jewelry from shop | सराफांच्या दुकानात हातचलाखी करणारी साथीदारासह जेरबंद

सराफांच्या दुकानात हातचलाखी करणारी साथीदारासह जेरबंद

ठळक मुद्देआर्थिक कोंडी फोडण्यासाठी अकाउंटंट बनली चोर

नागपूर : सराफांच्या दुकानात दागिने पाहताना हातचलाखी करणाऱ्या एका उच्च शिक्षित महिलेला तिच्या साथीदारासह तहसील पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील तीन लाख, १५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

छाया भोयर (२६) आणि राकेश भोयर अशी आरोपींची नावे आहेत. छाया मूळची मध्य प्रदेशातील (छिंदवाडा) रहिवासी आहे. ती उच्च शिक्षित असून, अकाउंटंट म्हणून शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करायची. दोन तीनही भाषांवर प्रभुत्व असलेली छाया उत्तम वाक्पटू आहे.

गर्भवती झाल्याने ती कामावर जाऊ शकली नाही. परिणामी तिची नोकरी गेली आणि तिची आर्थिक कोंडी झाली. झटपट रक्कम मिळवण्यासाठी तिने राकेशला सोबत घेऊन सराफा व्यापाऱ्यांकडे हात मारण्याची योजना बनविली. त्यानुसार, २१ ऑक्टोबरला इतवारीतील एका, तर २५ ऑक्टोबरला दुसऱ्या एका सराफा व्यापाऱ्याकडे हातचलाखी केली. दोन्ही ठिकाणच्या चोरीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

दुचाकीने दाखविला मार्ग

आरोपीला शोधण्यासाठी दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात छाया तिच्या पतीसह दुचाकीवरून जाताना आढळली. तो धागा पकडून पोलिसांनी छाया तसेच राकेशला ताब्यात घेतले. त्यांनी या दोन्ही गुन्ह्याची कबुली देऊन चोरीचा माल पोलिसांच्या हवाली केला.

Web Title: couple arrested for theft gold jewelry from shop