यंदाही कापूस दहा हजारी; रुपयाच्या अवमूल्यनाचा कापसाला फायदा

By सुनील चरपे | Published: September 27, 2022 04:16 PM2022-09-27T16:16:43+5:302022-09-27T16:21:28+5:30

संपूर्ण जगात मागील व चालू हंगामात कापसाचे उत्पादन कमालीचे घटत असून, मागणी व वापर वाढत असताना कापसाचे दर मात्र दबावात आले आहेत.

cotton ten thousand this year too; benefits from rupee depreciation | यंदाही कापूस दहा हजारी; रुपयाच्या अवमूल्यनाचा कापसाला फायदा

यंदाही कापूस दहा हजारी; रुपयाच्या अवमूल्यनाचा कापसाला फायदा

Next

नागपूर : गतवर्षी कापसाचे दर १२ हजार रुपये प्रति क्विटलपर्यंत चढल्यानंतर शेतकरी चालू हंगामात (२०२२-२३] अधिक दर मिळण्याची अपेक्षा बाळगून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रविवार (दि.२५) चे दर ८,८३५ रुपये प्रति क्विटल (११५ सेंट प्रति पाउंड) होते. राज्यात दसऱ्याला खरेदी मुहूर्तावळी ८,५०० ते ९.००० रुपये दर मिळू शकतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

सरकीच्या दरावर ठरतो कापसाचा भाव

भारतात कापसाचे दर सरकीच्या दरावर अवलंबून असतात. एक क्विंटल कापसातून ३३ ते ३४ किलो रुई आणि ६३ ते ६४ किलो सरकी मिळते. अंदाजे दोन किलो रुई व सरकी तुटीत जाते. सध्या सरकीचे दर ३४ रुपये प्रति किलो आहेत. सोयाबीन बाजारात आल्यानंतर सरकीचे दर ३० रुपये प्रति किलोपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

वर्ष - पेरणी क्षेत्र - उत्पादन
२०२०-२१  --  ---------------  --  ३६७ लाख गाठी
२०२१-२२  --  ११७ लाख हेक्टर  --  ३६५ लाख गाठी
२०२२-२३ --  १२६ लाख हेक्टर  --   ३७५ लाख गाठी (अंदाज)

(सरासरी आकडेवारी, एक गाठ १७० किलो)

सरासरी दर (रुपये प्रति क्विंटल)

सन २०२०-२१ -- ५००० ते ६०००
सन २०२१-२२ -- ७३०० ते १९,९००
सन २०२२-२३ (ऑगस्ट) -- ७,००० ते ११,८००
सन २०२२-२३ (सप्टेंबर)  -- ८,५०० ते ९,१००

उत्तर भारतात घसरले, तर गुजरातेत दर चढे

यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतात ६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या काळात कापसाचे दर ७,००० ते ११,९०० रुपये होते. ते १ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर काळात ८५०० ते ९,१०० रुपयांवर आले. याच काळात गुजरातमध्ये दर १० ते १२ हजार रुपये होते. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर १०,७०१ ते १६,००० रुपये दराने खरेदी झाली.

सुताची मागणी घटली

संपूर्ण जगात मागील व चालू हंगामात कापसाचे उत्पादन कमालीचे घटत असून, मागणी व वापर वाढत असताना कापसाचे दर मात्र दबावात आले आहेत. भारतीय वस्त्रोद्योगाने कापसाला पर्याय म्हणून पॉलिस्टरच्या धाग्यांच्या वापराला प्राधान्य दिल्याने सुताची मागणी घटली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मिळणारा भाव रुपयाच्या अवमूल्यनामुळे मिळत असून, डॉलरचे मूल्य ८० रुपयांपेक्षा कमी असते तर हा दर यापेक्षा कमी मिळाला असता.

विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक

Web Title: cotton ten thousand this year too; benefits from rupee depreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.