शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

रेल्वे प्रशासनावर १० हजार रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:55 AM

रेल्वे प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत वेकोलिला दिली नाही. त्यामुळे न्यायालयाने बुधवारी रेल्वे प्रशासनावर १० हजार रुपयांचा दावा खर्च बसवला. तसेच, संबंधित प्रकरणावर १३ जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

ठळक मुद्देहायकोर्ट : वेकोलिला प्रतिज्ञापत्राची प्रत दिली नाही

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत वेकोलिला दिली नाही. त्यामुळे न्यायालयाने बुधवारी रेल्वे प्रशासनावर १० हजार रुपयांचा दावा खर्च बसवला. तसेच, संबंधित प्रकरणावर १३ जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.देशामध्ये कोळशाचा पुरेसा साठा आहे, पण रेल्वेगाड्या उपलब्ध होत नसल्यामुळे महाजनकोपर्यंत वेळेवर कोळसा पोहचविता येत नाही असा आरोप वेकोलिने केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांची आकडेवारी सादर करून वेकोलिचे आरोप फेटाळून लावले होते. त्या प्रतिज्ञापत्राची प्रत रेल्वेने वेकोलिला दिली नाही. त्यामुळे वेकोलिला बुधवारी स्वत:ची बाजू स्पष्ट करता आली नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने रेल्वेला दणका दिला. न्यायालयात कोळसा आयात व त्यात होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :railwayरेल्वेHigh Courtउच्च न्यायालय