शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मनोरुग्णालयात रुग्णांच्या नोंदणी शुल्कात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 19:27 IST

रुग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणाऱ्या  स्थानिक मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे.

ठळक मुद्देलिपिकाने हडपले ३० हजार : गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतनागपूर : रुग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणाऱ्या  स्थानिक मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे. राजकुमार पुंडलिक ठोमळे (वय ५७, रा. चंदनशेषनगर) असे आरोपी लिपिकाचे नाव असून, मानकापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.मानकापूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील ओपीडीत ठोमळेची रुग्ण पंजीकरणासाठी नियुक्ती होती. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाची नोंदणी करण्यासाठी ४० रुपये शासकीय शुल्क आहे. मात्र, आरोपी ठोमळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून ८० रुपये घ्यायचा. त्याची पावती देण्यापूर्वी आरोपी कार्बन कॉपीवर ८० ऐवजी ४० रुपये नोंदवायचा. अशा प्रकारे त्याने रुग्णांचे नातेवाईक आणि प्रशासनासोबत तब्बल तीन वर्षे बनवाबनवी केली. त्याचप्रमाणे २६ डिसेंबर २०१४ ते १० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत २९,४७६ रुपयांची अफरातफर केली. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर वरिष्ठांनी ठोमळेला विचारणा केली असता तो असंबंद्ध माहिती देऊ लागला. तो गुन्ह्याची कबुली देत नसल्यामुळे डॉ. प्रवीण निलकंठ नवघरे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून एएसआय एजाज शेख यांनी आरोपी ठोमळेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.सामान्य रुग्ण बीपीएल गटातआरोपी ठोमळे एकीकडे रुग्ण नोंदणीचे दुप्पट शुल्क उकळत असतानाच एक पावती दोन रुग्णांच्या कार्डवर लावत होता. दुसरे म्हणजे, दारिद्र्य रेषेखाली (बीपीएल) नसलेल्या रुग्णांचीही तो स्वत:च्या मनाने बीपीएल पेशंट म्हणून नोंदणी करीत होता, असेही प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर