नागपुरात साहिल सय्यदच्या बंगल्यावर मनपाचा हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:18 IST2020-08-12T17:18:24+5:302020-08-12T17:18:54+5:30
साहिल सय्यद याने अतिक्रमण करून साडेतीन हजार चौरस फूट जागेत तीन मजली बंगला उभारला आहे.

नागपुरात साहिल सय्यदच्या बंगल्यावर मनपाचा हातोडा
नागपूर : नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या व बनावट व्हिडिओ प्रकरणी चर्चेत आलेल्या साहिल सय्यदच्या मानकापूर परिसरातील बगदादीया नगर येथील अवैध अलिशान बंगल्यावर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी हातोडा चालविला.
साहिल सय्यद याने अतिक्रमण करून साडेतीन हजार चौरस फूट जागेत तीन मजली बंगला उभारला आहे. तसेच बाजूला अतिक्रमण करून अनधिकृत शेड उभारले आहे.
यासंदर्भात मनपाने २४ जुलैला अतिक्रमण हटविण्यास संदर्भात नोटीस बजावली होती परंतु त्यानंतरही अतिक्रमण न काढल्याने मनपाच्या पथकाने अतिक्रमण पाण्याला सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.