जीर्ण दुकानावर मनपाचा हातोडा : प्रवर्तन विभागाची अतिक्रमण कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:39 IST2021-04-09T00:38:49+5:302021-04-09T00:39:59+5:30
Encroachment action सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील मस्कासाथ इतवारी येथील ओंकार पारधी यांच्या जीर्ण दुकानामुळे धोका निर्माण झाला होता. महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने गुरुवारी या दुकानाचे बांधकाम पाडले.

जीर्ण दुकानावर मनपाचा हातोडा : प्रवर्तन विभागाची अतिक्रमण कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील मस्कासाथ इतवारी येथील ओंकार पारधी यांच्या जीर्ण दुकानामुळे धोका निर्माण झाला होता. महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने गुरुवारी या दुकानाचे बांधकाम पाडले. पारधी यांना यासंदर्भात आधी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यांनी जीर्ण दुकान पाडण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे मनपा पथकाने कारवाई केली.
लक्ष्मीनगर झोनमधील लक्ष्मीनगर चौक ते ऑरेज सिटी हॉस्पिटल चौक ते सोमलवाडा ते वर्धा रोडवरील २६ अतिक्रमण हटवून फूटपाथ मोकळे केले. आसीनगर झोनच्या पथकाने कमाल चौक ते इंदोरा ते वैशालीनगर दरम्यानच्या मार्गाच्या दोन्ही बाजूची २२ अतिक्रमणे हटविण्यात आली. या मार्गाच्या फूटपाथवर ठेले, दुकानदारांनी अतिक्रमण केले होते.