शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Vidarbha : विदर्भात कोरोना बाधितांची संख्या १० :  गोंदियात युवकाला लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 20:37 IST

विदर्भात कोरोना बाधितांची संख्या आता १० झाली आहे. गोंदिया मेडिकलमध्ये संशयित म्हणून भरती असलेल्या २३ वर्षीय युवकाचे नमुने शुक्रवारी पहाटे पॉझिटिव्ह आले.या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत.

ठळक मुद्देउपचार करणारे  डॉक्टरही संशयित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गोंदिया मेडिकलमध्ये संशयित म्हणून भरती असलेल्या २३ वर्षीय युवकाचे नमुने शुक्रवारी पहाटे पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहे. या रुग्णासह विदर्भात कोरोना बाधितांची संख्या आता १० झाली आहे. नागपुरात गुरुवारी कोरोनामुक्त झालेला एका रुग्णाला घरी सोडले असताना त्याचवेळी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. नागपुरात आता पाच, यवतमाळ जिल्ह्यात चार तर गोंदिया जिल्ह्यात एक अशी रुग्णांची संख्या झाली आहे. लोकांनी खबरदारी न घेतल्यास ही संख्या वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहे. प्राप्त माहितीनुसार, गोंदियातील रहिवासी असलेला २३ वर्षीय युवक थायलंडला गेला होता. आठवड्यापूर्वी नागपूरमार्गे गोंदियाला पोहचला. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्याला सर्दी, खोकला व तापाचे लक्षण आढळून आले. एका खासगी इस्पितळात उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी नमुने तपासण्यासाठी गोंदिया मेडिकलमध्ये पाठविले. आज त्याचे नमुने पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरामध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास वाढल्याने संशयित म्हणून त्यांचेही नमुने पाठविण्यात आले.

 गोंदिया मेडिकलमध्ये अल्प मनुष्यबळमेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) गोंदिया मेडिकलमधील अल्प मनुष्यबळ व अपुऱ्या सोयींवर नुकतेच ताशेरे ओढले आहेत. यावर उपाय म्हणून नागपूर मेडिकलमधील २१ तर मेयोमधील एका अध्यापकाची तात्पुरती नेमणूक गोंदिया मेडिकलमध्ये करण्यात आली. या डॉक्टरांनी नियुक्तीपत्र तर घेतले परंतु कोणी रुजूच झाले नाही. विशेष म्हणजे, ते गोंदियाचे नाव पुढे करून मेयो, मेडिकलमध्येही सेवा देत नसल्याचे बोलले जात आहे. आता गोंदियातच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने व इतरांनाही लागण होण्याची शक्यता असल्याने शासन आतातरी मनुष्यबळ देईल का, असा प्रश्न गोंदियावासीयांंनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल