coronavirus : नागपुरात २५ व २६ जुलै रोजी जनता कर्फ्यू ; आयुक्त व महापौरांची संयुक्त घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:30 IST2020-07-24T16:29:35+5:302020-07-24T16:30:24+5:30
या कर्फ्यूला जनतेने पाठिंबा द्यावा व कोरोना संपुष्टात आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन या दोघांनी केले आहे.

coronavirus : नागपुरात २५ व २६ जुलै रोजी जनता कर्फ्यू ; आयुक्त व महापौरांची संयुक्त घोषणा
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांनी दि. २५ व २६ जुलै रोजी शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. शुक्रवारी आयोजित बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
या जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील सर्व व्यवहार बंद राहतील. मात्र, यातून वैद्यकीय सेवा, कचरा संकलन, पाणी पुरवठा व वृत्तपत्रे यांना वगळण्यात आलं आहे. या कर्फ्यूला जनतेने पाठिंबा द्यावा व कोरोना संपुष्टात आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन या दोघांनी केले आहे.