शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : पॉझिटिव्हिटीचा दर २२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 23:38 IST

CoronaVirus in Nagpur कोरोनाबाधितांच्या संख्येने मागील महिन्यात एकाच दिवशी ७,९९९ रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ३१ टक्क्यांवर पोहचला होता. मात्र, गुरुवारी हाच दर २२ टक्क्यांवर आला. आज ४,९०० नवे रुग्ण व ८१ मृत्यू नोंदविण्यात आले.

ठळक मुद्दे ४,९०० नवे रुग्ण, ८१ मृत्यू : दैनंदिन बाधितांच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येने मागील महिन्यात एकाच दिवशी ७,९९९ रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ३१ टक्क्यांवर पोहचला होता. मात्र, गुरुवारी हाच दर २२ टक्क्यांवर आला. आज ४,९०० नवे रुग्ण व ८१ मृत्यू नोंदविण्यात आले. रुग्णांची एकूण संख्या ४,३७,८३८ तर मृतांची संख्या ७,९०९ झाली. विशेष म्हणजे, दैनंदिन बाधितांच्या तुलनेत अधिक म्हणजे ६,३३८ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचाही दर वाढून ८३ टक्क्यांवर गेला आहे.

कोरोनाचा वेग मंदावत असल्याने नागपूर जिल्ह्यात काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. १ मे रोजी ६,५७६ रुग्ण आढळून आले असताना त्यानंतर सलग पाच दिवस दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजाराखाली होती. गुरुवारी १८,००३ आरटीपीसीआर तर ३,८७५ रॅपिड अँटिजेन असे एकूण २१,८७८ चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरमधून ३,९८८ तर अँटिजेनमधून ९१२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत असली तरी मेयो, मेडिकल व एम्ससह काही खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळविणे अद्यापही कठीण आहे. सध्या मेडिकलमध्ये ८००, मेयोमध्ये ६०० तर एम्समध्ये २३६ रुग्ण उपचार घेत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटर मिळून १३,०२८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ५१,५६९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

शहरात २,७२० तर ग्रामीणमध्ये २,१६७ रुग्ण

गुरुवारी शहरात २,७२० रुग्ण व ४७ मृत्यूची नोंद झाली, तर ग्रामीणमध्ये २,१६७ रुग्ण व २१ रुग्णांचे बळी गेले. जिल्हाबाहेरील नागपुरात उपचार घेत असलेले १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले व तेवढ्याच रुग्णांचे मृत्यूही झाले. शहरात आतापर्यंत ३,१२,०२४ रुग्ण व ४,७८० मृत्यूची नोंद झाली तर, ग्रामीणमध्ये १,२४,५०४ रुग्ण आढळून आले व २,००१ रुग्णांचे बळी गेले.

सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट

२९ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ७७,६२७ होती. मात्र, त्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने या संख्येतही घट दिसून येत आहे. गुरुवारी ६४,५९७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते.

कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: २१,८७८

ए.बाधित रुग्ण :४,३७,८३८

सक्रिय रुग्ण : ६४,५९७

बरे झालेले रुग्ण :३,६५,३३२

ए.मृत्यू : ७,९०९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर