CoronaVirus in Nagpur : पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, रिकव्हरी रेट घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 23:07 IST2021-01-06T23:05:15+5:302021-01-06T23:07:08+5:30
Corona Virus, Nagpur news नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या घसरली आहे. त्यामुळे नागपूरचा रिकव्हरी रेट घसरून ९३.४७ वर पोहोचला आहे.

CoronaVirus in Nagpur : पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, रिकव्हरी रेट घसरला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या घसरली आहे. त्यामुळे नागपूरचा रिकव्हरी रेट घसरून ९३.४७ वर पोहोचला आहे.
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४२५६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात ४३४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,२६,१८९ इतकी झाली असून ३९८४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत १,१७,९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागपूर जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३४४, ग्रामीणमधील ८७ आणि जिल्ह्याबाहेरचे ३ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील २ आणि ३ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. गेल्या २४ तासात ४९७० जणांचे नमुने तपासण्यात आले. यात शहरातील ३७८७ आणि ग्रामीणमधील ११८३ आहेत.
सक्रिय - ४२५६
बरे झालेले - १,१७,९४९
मृत - ३९८४