शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

CoronaVirus in Nagpur : लॉकडाऊनच्या प्रभावाने रुग्णसंख्या घटतेय, मृत्यूसंख्येत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 9:55 PM

CoronaVirus , Nagpur news लॉकडाऊनचा प्रभाव आता दिसून येऊ लागला आहे. ३८०० दरम्यान गेलेली रुग्णसंख्या आता ३२०० वर आली आहे. निर्बंधाचे आणखी दोन दिवस आहेत. नागरिकांनी संयम व कोरोना प्रतिबंधाचे कठोरतेने नियम पाळल्यास ही रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्दे३५ मृत्यू, ३२३५ पॉझिटिव्हची भर, चाचण्यांचा नवा विक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : लॉकडाऊनचा प्रभाव आता दिसून येऊ लागला आहे. ३८०० दरम्यान गेलेली रुग्णसंख्या आता ३२०० वर आली आहे. निर्बंधाचे आणखी दोन दिवस आहेत. नागरिकांनी संयम व कोरोना प्रतिबंधाचे कठोरतेने नियम पाळल्यास ही रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शुक्रवारी ३२३५ नव्या रुग्णांची भर पडली. मात्र, दैनंदिन मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच ३५ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,८५,७८७ तर, मृत्यूची संख्या ४५६३ झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा बारा महिन्यांच्या काळात सर्वाधिक रुग्ण, मृत्यू व चाचण्यांची नोंद सप्टेंबर महिन्यात झाली; परंतु मार्च महिन्यात रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला. आता चाचण्यांचा नवा विक्रम स्थापन केला. शुक्रवारी सर्वाधिक १६,०६६ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात १२,५८७ आरटीपीसीआर, तर ३,४७९ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे. आरटीपीसीआरमधून ३१०३, तर अँटिजनमधून १३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, एकूण चाचण्यांमधून १२,८३१ रुग्ण निगेटिव्ह आले. हा दर ७९.८६ टक्के आहे. शुक्रवारी सर्वाधिक तपासण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. ६८५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ५४२९ निगेटिव्ह, तर १४२४ पॉझिटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत २२३३ चाचण्यांमधून १५३६ निगेटिव्ह, तर ६९७ पॉझिटिव्ह, मेयोच्या प्रयोगशाळेत १९१९ चाचण्यांमधून १५२६ निगेटिव्ह, तर ३९३ पॉझिटिव्ह, एम्सच्या प्रयोगशाळेत ९४० चाचण्यांमधून ५६० निगेटिव्ह, तर ३८० पॉझिटिव्ह, नीरीच्या प्रयोगशाळेत २७६ चाचण्यांमधून १५२ निगेटिव्ह, तर १२४ पॉझिटिव्ह, तर नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३६६ चाचण्यांमधून २८१ निगेटिव्ह, तर ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

शहरात २५२४, तर ग्रामीणमध्ये ७०८ रुग्ण

शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. शुक्रवारी शहरात २५२४ रुग्ण, तर ग्रामीणमध्ये ७०८ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये शहरात २३, ग्रामीणमध्ये ९ रुग्णांचे मृत्यू झाले. एकूणच शहरात १४८२७६ रुग्ण व २९३१ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये ३६५१८ रुग्ण व ८२१ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ९९३ व मृतांची संख्या ८११वर पोहोचली आहे.

१२४५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात रुग्ण बरे होण्याचा दर घसरून ८३.७४ टक्क्यांवर आला आहे. मात्र, मागील सात दिवसांपासून हजारावर रुग्ण बरे होत आहेत. शुक्रवारी १२४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत १,५५,६५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे.

२५ हजारांवर कोरोनाचे सक्रिय रुग्ण

नागपूर जिल्ह्यात २५,५६९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १९,१०८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये म्हणजे गृहविलगीकरणात आहेत. ६४६१ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

 कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १६०६६

एकूण बाधित रुग्ण : १,८५,७८७

सक्रिय रुग्ण :२५,५६९

बरे झालेले रुग्ण :१,५५,६५५

एकूण मृत्यू : ४५६३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर