Coronavirus in Nagpur; नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमण थांबता थांबेना; बाधितांचा आकडा ७७७१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 20:04 IST2021-04-25T20:03:46+5:302021-04-25T20:04:51+5:30
Coronavirus in Nagpur नागपूर जिल्ह्यात एका दिवसात ७,७७१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus in Nagpur; नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमण थांबता थांबेना; बाधितांचा आकडा ७७७१
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कठोर निर्बंध घातल्यानंतरही नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा आकडा कमी होताना दिसत नाही. एप्रिल महिन्यात सलग पाचव्या दिवशी सात हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एका दिवसात ७,७७१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात संक्रमणाचा प्रकोप सुरू आहे. रविवारी ५,१३० रुग्ण कोरोनामुक्त झाले.
रविवारी २४,७०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी मिळालेल्या संक्रमितांमध्ये शहरातील ४,७२०, ग्रामीणमधील ३,०४० व जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये शहरातील ४६, ग्रामीणमधील ३०, जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. रविवारी ५,१३० जण कोरोनामुक्त झाले. यात शहरातील ३,९२२, ग्रामीणमधील १,७३८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत २,८९,६९६ संक्रमित कोरोनामुक्त झाले असून, रिकव्हरी रेट ७७.४२ टक्के आहे.
२४ तासात २४,७०१ नमुन्यांची तपासणी
नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात संक्रमण झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत २१ लाख ५८ हजार ३९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गेल्या २४ तासात २४,७०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील १६,३७९ तर ग्रामीणमधील ८,३२२ नमुने आहेत.
सक्रिय ७७ हजारांहून अधिक
नागपूर जिल्ह्यात संक्रमित रूग्णांची संख्या ७७,५५६पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील ४७,०६७ तर ग्रामीणमधील ३०,४८९ रूग्ण आहेत. मागील काही दिवसात शहरातील संक्रमण कमी होताना दिसत नाही. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.