CoronaVirus in Nagpur : ४००० कोरोनाबाधितांचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 12:09 AM2021-01-09T00:09:50+5:302021-01-09T00:11:48+5:30

Corona Virus , nagpur news कोरोनाने १० महिन्याच्या काळात ४००० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यात शहरातील २६६७, ग्रामीण भागातील ७०७ तर जिल्हाबाहेरील ६२६ आहेत. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले.

CoronaVirus in Nagpur: 4000 corona victims died | CoronaVirus in Nagpur : ४००० कोरोनाबाधितांचा गेला जीव

CoronaVirus in Nagpur : ४००० कोरोनाबाधितांचा गेला जीव

Next
ठळक मुद्दे४५६ नव्या रुग्णांची भर, ७ मृत्यू : सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाने १० महिन्याच्या काळात ४००० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यात शहरातील २६६७, ग्रामीण भागातील ७०७ तर जिल्हाबाहेरील ६२६ आहेत. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. या महिन्यात १४०६ रुग्णांचे बळी गेले. शुक्रवारी पुन्हा ७ रुग्णांचा जीव गेला तर ४५६ नव्या रुग्णांची भर पडली. बाधितांची एकूण संख्या १२७११०वर पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.१४ टक्के मृत्यू झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. नंतर हळूहळू रुग्णांची संख्या वाढताच मृत्यूची संख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८, ऑगस्ट महिन्यात ९१९, सप्टेंबर महिन्यात १४०६, ऑक्टोबर महिन्यात ९५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्यापासून मृत्यूची संख्या कमी होऊ लागली. या महिन्यात २६९ तर डिसेंबर महिन्यात २५८ रुग्णांचे बळी गेले. मृतांमध्ये ५० वर्षांवरील वयोगटातील रुग्णांची संख्या मोठी आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूला श्वसनाचा आजार, अनियंत्रित मधुमेह, उच्चरक्तदाब, मूत्रपिंड व यकृताचा आजारही कारणीभूत ठरला आहे.

३५८ रुग्ण झाले बरे

आज ४९३८ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ४१७६ आरटीपीसीआर तर ७६२ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३५६, ग्रामीण भागातील ९६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्ण होते. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीण भागातील १ तर जिल्हाबाहेरील ४ होते. ३५८ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ११८६३९ झाली आहे. ४४७१ कोरोनाचे रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

महिन्यातील मृत्यू

महिना मृत्यू

एप्रिल २

मे ११

जून १५

जुलै ९८

ऑगस्ट ९१९

सप्टेंबर १४०६

ऑक्टोबर ९५२

नोव्हेंबर २६९

डिसेंबर २५८

Web Title: CoronaVirus in Nagpur: 4000 corona victims died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.