नागपुरात कोरोनाचा कहर कायम  : ३,७१७ पॉझिटिव्ह, ४० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:23 PM2021-03-24T23:23:22+5:302021-03-24T23:25:19+5:30

Corona's 'havoc' persists , nagpur news ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग वाढीस लागला आहे. नागपूर जिल्ह्यात बुधवारी ३ हजार ७१७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ४० जणांचा मृत्यू झाला.

Corona's 'havoc' persists in Nagpur: 3,717 positive, 40 death | नागपुरात कोरोनाचा कहर कायम  : ३,७१७ पॉझिटिव्ह, ४० जणांचा मृत्यू

नागपुरात कोरोनाचा कहर कायम  : ३,७१७ पॉझिटिव्ह, ४० जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनवीन बाधितांसह मृत्यूदेखील वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग वाढीस लागला आहे. नागपूर जिल्ह्यात बुधवारी ३ हजार ७१७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ४० जणांचा मृत्यू झाला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी बाधितांची व मृत्यूची संख्या वाढली. पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या २ लाख ३ हजार ४८८ इतकी झाली असून मृत्यूचा आकडा ४ हजार ७३७ वर पोहोचला आहे.

बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये शहरातील २ हजार ९३२, ग्रामीणमधील ७८२ व जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. तर २ हजार ९८ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १ लाख ६५ हजार १७९ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र रिकव्हरीचा दर ८१.१७ टक्क्यांवर घसरला आहे.

चाचण्यांचा ‘रेकॉर्ड’

बुधवारी १७ हजार १५५ नमुने तपासण्यात आले. यात नागपूर शहरातील ११ हजार ९५४ व ग्रामीणमधील ५ हजार २०१ जण आहेत. खासगी प्रयोगशाळांत १,७१९, अँटिजेन चाचण्यांत ११७, एम्सच्या प्रयोगशाळेत ८२३, मेयोच्या प्रयोगशाळेत २९८, नीरीच्या प्रयोगशाळेत १०४, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३२५ नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले.

२५ हजार बाधित ‘होम आयसोलेशन’मध्ये

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ५७२ इतकी झाली आहे. यात शहरातील २५ हजार ७८५ व ग्रामीणमधील ७ हजार ७८७ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २५ हजार ५३५ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत. तर ८ हजार ३७ रुग्ण विविध रुग्णालयांत भरती आहेत.

पॉझिटिव्ह - ३,७१७

मृत्यू- ४०

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण - ३३,५७२

Web Title: Corona's 'havoc' persists in Nagpur: 3,717 positive, 40 death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.