शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

CoronaVirus in Nagpur : नागपुरात सारीच्या दोन रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 11:30 PM

शुक्रवारी ५४ रुग्णांची नोंद झाली असताना शनिवारी १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये एक ‘सारी’चा रुग्ण आहे. गोधनीमध्ये पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ६९२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये आज दोन ‘सारी’ रुग्णाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोविडचे १० रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या ६९१ : गोधनीत पहिल्यांदाच रुग्णाची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शुक्रवारी ५४ रुग्णांची नोंद झाली असताना शनिवारी १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये एक ‘सारी’चा रुग्ण आहे. गोधनीमध्ये पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ६९२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये आज दोन ‘सारी’ रुग्णाचा मृत्यू झाला. यात दीड वर्षाचा चिमुकला असून दुसरा रुग्ण ४०वर्षीय पुरुष आहे. मार्च ते आतापर्यंत सारीच्या २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. बिडगाव येथील एक वर्षे सात महिन्याच्या बालकाला मेडिकलमध्ये आज सकाळी भरती केले. बालकाला ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’(सारी) चा आजार होता. त्याची प्रकृती गंभीर होती. तातडीने उपचार करण्यात आले, परंतु दुपारी २.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची कोविड तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली. कळमेश्वर येथील ‘सारी’चा दुसरा ४४ वर्षीय रुग्ण शनिवारी पहाटे ४.४० वाजता मेडिकलमध्ये भरती झाला. उपचार सुरू असतानाच दुपारी १२.३० वाजता मृत्यू झाला. या रुग्णाचीही कोविड तपासणी निगेटिव्ह आली. सध्या मेडिकलमध्ये सारीचे ८ रुग्ण उपचार घेत आहेत.सारीचा एक रुग्ण पॉझिटिव्हपरतवाडा येथून मेडिकलमध्ये ‘सारी’वरील उपचारासाठी भरती झालेल्या ६२ वर्षीय महिलेचा नमुना कोविड पॉझिटिव्ह आला. अमरावती येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यही पॉझिटिव्ह आले. हे तिन्ही रुग्ण सिम्बॉयसिस येथे क्वारंटाईन होते. सेमिनरी हिल्स येथील दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेली एक महिला शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर आज महिलेचा पती पॉझिटिव्ह आला. सिंधी रेल्वे येथे काम करणारा वर्धेतील एका कर्मचाऱ्याचा नमुना मेडिकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. कळमेश्वर तालुक्यातील १४ मैल गावातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, याच गावातील ५४ वर्षीय महिला सतरंजीपुरा येथे अंत्यसंस्काराला गेली असता ती पॉझिटिव्ह आली. आज तिचा ४० वर्षीय मुलगा व ३९ वर्षीय सूनही पॉझिटिव्ह आली. या शिवाय जुनी मंगळवारी येथूनही एका रुग्णाची नोंद झाली. मेयो व मेडिकलच्या प्रयोगशाळेतून नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

गोधनी रुग्णाचा तामिळनाडू प्रवासाचा इतिहासगोधनी येथील साई श्रद्धानगर सोसायटी येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती शुक्रवारी तामिळनाडू येथून घरी परतली. कुठलीही लक्षणे नसली तरी खबरदारी म्हणून एका खासगी प्रयोगशाळेत नमुना तपासला असता अहवाल पॉझिटिव्ह आला. गोधनीमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

२२ रुग्णांना रुग्णालयातून सुटीमेडिकलमधून दोन, एम्समधून पाच तर मेयोमधून १५ असे २२ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना सुटी देण्यात आली. यात मेडिकलमधील कसाबपुरा येथील १८ वर्षीय व ६० वर्षीय पुरुष आहे. मेयोतील नाईक तलाव, बांगलादेश येथील दोन, सैफीनगर येथील दोन, सीए रोडवरील चार, हंसापुरी येथील एक, गिट्टीखदान येथील एक, टांगा स्टॅण्ड येथील एक, मोमीनपुरा येथील एक, तर तिघे नागपूर जिल्हाबाहेरील आहेत. एम्समधून सुटी देण्यात आलेल्या पाच रुग्णांची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ९८दैनिक तपासणी नमुने १९६दैनिक निगेटिव्ह नमुने १८७नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६९२नागपुरातील मृत्यू १३डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४४५डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३०२७क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १५८१-पीडित-६९२-दुरुस्त-४४५-मृत्यू-१३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू