CoronaVirus in Nagpur :नागपूर जिल्ह्यात केवळ ९ मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:22 IST2020-10-10T23:21:03+5:302020-10-10T23:22:37+5:30
Corona Virus Death Toll Controlling, Nagpur Newsकोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ६४वर गेलेली मृतांची संख्या शनिवारी १७ वर आली. यातही ९ मृत्यू हे जिल्ह्यातील रुग्णांचे असून उर्वरित ८ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत.

CoronaVirus in Nagpur :नागपूर जिल्ह्यात केवळ ९ मृत्यूची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ६४वर गेलेली मृतांची संख्या शनिवारी १७ वर आली. यातही ९ मृत्यू हे जिल्ह्यातील रुग्णांचे असून उर्वरित ८ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. आज ६,५४०वर चाचण्या झाल्या असताना ६२७ बाधितांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ८६,०९० झाली तर मृतांची संख्या २,७६७ वर पोहचली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समधानकारक बाब म्हणजे, दिवसेंदिवस उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला १४ हजारांवर रुग्ण उपचार घेत होते. सध्या ८,६०६ रुग्ण विविध शासकीय, खासगी हॉस्पिटलसह होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक राहत आहे. आज ८३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८६.७७ टक्क्यांवर गेले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४१८, ग्रामीण भागातील २०१ तर ८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.
२,८९५ अॅन्टिजेन चाचणीतून २६२ बाधित
नागपूर जिल्ह्यात २,८९५ रुग्णांची रॅपिड अन्टिजेन चाचणी करण्यात आली. यात २६२ रुग्ण बाधित तर २६३३ रुग्ण निगेटिव्ह आले. इतर प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचणीतून ३६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेतून १५, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २९, मेयोच्या प्रयोगशाळेतून ६६, माफसूच्या प्रयोगशाळेतून ४४, नीरीच्या प्रयोगशाळेतून २७, खासगी प्रयोगशाळेतून २६२ रुग्णांची नोंद झाली.
कोविड केअर सेंटर रिकामे होण्याच्या मार्गावर
बाधितांची संख्या कमी होताच कोविड केअर सेंटरही रिकामे होऊ लागले आहेत. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या आणि घरी होम आयसोलेशनची सोय नसलेल्या रुग्णांसाठी हे सेंटर आहेत. जिल्ह्यात १९ सेंटर आहेत. सध्या यातील सहा सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. शहरातील पाचपावली सेंटरमध्ये ८०, आमदार निवासात ५२ तर व्हीएनआयटीमध्ये १५ रुग्ण आहेत. इतर कोविड केअर सेंटरमध्ये १५ ते ३० रुग्ण दाखल आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,५४०
बाधित रुग्ण : ८६,०९०
बरे झालेले : ७४,७१७
उपचार घेत असलेले रुग्ण : ८,६०६
मृत्यू : २,७६७