शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

CoronaVirus in Nagpur : नागपुरात धोका वाढला! आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 11:20 PM

रुग्णसंख्येचा जुना विक्रम मोडित काढत नागपूर जिल्ह्यात शनिवारी तब्बल ६५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ग्रामीणमधील १०९ तर शहरातील ५५० रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या रोजच्या रुग्णांमधील ही मोठी वाढ आहे.

ठळक मुद्दे६५९ रुग्ण पॉझिटिव्ह, २३ रुग्णांचा मृत्यू : ग्रामीणमध्ये १०९ तर शहरात ५५० पॉझिटिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णसंख्येचा जुना विक्रम मोडित काढत नागपूर जिल्ह्यात शनिवारी तब्बल ६५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ग्रामीणमधील १०९ तर शहरातील ५५० रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या रोजच्या रुग्णांमधील ही मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ८४०६ झाली आहे. यातच ग्रामीणमधील एक तर शहरातील २२ अशा २३ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली असून मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांची टक्केवारी ३.४७ झाली आहे. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण व मृतांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे यामुळे आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात चार दिवसात २३२१ रुग्णांची नोंद व १०३ रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहे. या दोन्ही संख्या काळजीत टाकणाऱ्या असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. मेयोमध्ये आज १० रुग्णांचे मृत्यू झाले. यात जयभीम चौक कळमना रोड येथील ५८वर्षीय पुरुष, पंचशीलनगर येथील ७० वर्षीय महिला, आशीर्वादनगर येथील ३५ वर्षीय पुरुष, पाचपावली येथील ५८ वर्षीय पुरुष, जलालपुरा गांधीबाग येथील ५६ वर्षीय पुरुष, कावरापेठ येथील ५५ वर्षीय पुरुष, जागनाथ बुधवारी येथील ५६ वर्षीय पुरुष, कामठी येथील ६५वर्षीय महिला, आमदार निवास येथील ४० वर्षीय पुरुष व मोठा ताजबाग येथील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना उच्चरक्तदाब, मधुमेह, न्यूमोनिया व यकृताचा आजार होता. उर्वरीत १३ मृतांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून उपलब्ध झालेली नाही. मेयोमध्ये आतापर्यंत १४१, मेडिकलमध्ये १२९ तर खासगी हॉस्पिटलमध्ये २२ असे २९२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यात ग्रामीणमधील ४७ तर शहरातील मृतांची संख्या २०१ आहे. जिल्हाबाहेरील मृतांची संख्या ४४ आहे. -अ‍ॅन्टिजन चाचणीत ९५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद क्वारंटाईन सेंटरवर नि:शुल्क रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. आज या चाचणीतून ९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, मेयोच्या प्रयोगशाळेतून १३५, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ११६, एम्सच्या प्रयोगशाळेतून ८९, नीरीच्या प्रयोगशाळेतून ९८, माफसूच्या प्रयोगशाळेतून ४५, खासगी लॅबमधून ८१ असे एकूण ६५९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. सध्या ३५६८ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज २०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४५४६ झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले परंतु होम आयसोलेशन असलेले ३७१ रुग्ण आहेत.१६ दिवसांच्या बाळाचाही घेतला जीवमेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १६ दिवसाच्या बाळाचाही कोरोनाने जीव घेतला. उदयनगर येथील रहिवासी असलेला या बालकाचा जन्म मेडिकलमध्येच झाला. प्रसुतीपूर्व करण्यात आलेल्या चाचणीत माता निगेटिव्ह होती. जन्मत:च बालकाला विविध आजार होते. डोक्यात पाणी झाल्याने शनिवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यापूर्वी शुक्रवारी कोविड चाचणी केली असता बालक पॉझिटिव्ह आले. परंतु उपचार सुरू असताना रात्रीच मृत्यू झाला. कोरोनाबाधित मृतांमध्ये विदर्भात हा सर्वात कमी वयाचा चिमुकला आहे.आरोग्य समिती सभापती पॉझिटिव्हमहापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी कोविड-१९ ची तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याला कुकरेजा यांनी दुजोरा दिला आहे. तसेच मागील सात दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे कुकरेजा मागील काही दिवसापासून आपल्या प्रभागात नागरिकांच्या आरोग्य तपासण्यासाठी शिबिरांचे आयोजन करीत होते.दैनिक संशयित : ३६२बाधित रुग्ण : ८४०६बरे झालेले : ४५४६उपचार घेत असलेले रुग्ण : ३५६८