शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा जोर कमी : दोन महिन्यानंतर २० मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:52 IST

Corona Virus , Nagpur News कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. मागील सात दिवसांत हजाराच्या आत रुग्ण, तर ३०च्या खाली रुग्णांचे मृत्यू झाले. दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी २० मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्दे७४६ नव्या रुग्णांची भर : बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८५ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. मागील सात दिवसांत हजाराच्या आत रुग्ण, तर ३०च्या खाली रुग्णांचे मृत्यू झाले. दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी २० मृत्यूची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्याही कमी होऊन ७४६ वर आली आहे. रुग्णांची एकूण संख्या ८४,८२७ तर मृतांची संख्या २,७२४ झाली आहे. मात्र, पुढील महिने थंडीचे आहेत. अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या या आठ महिन्यात सर्वाधिक रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले. या महिन्यात केवळ चार दिवसच रुग्णांची संख्या हजाराखाली होती. २,३४३ हा रुग्णसंख्येचा उच्चांक ठरला. विशेष म्हणजे, १५ आॅगस्ट रोजी १४ मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू १७ सप्टेंबर रोजी झाले. ६४ मृत्यूने वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले होते. परंतु नंतर मृत्यूची संख्या कमी होऊ लागली. लवकरच स्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेयो, मेडिकलमध्येही रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मेयोमध्ये २२४ तर मेडिकलमध्ये २८१ रुग्ण उपचार घेत आहेत.६,१६५ चाचण्यांमधून ५,४१९ रुग्ण निगेटिव्हनागपूर जिल्ह्यात आज ३,४४८ आरटीपीसीआर तर २,७१७ रॅपिड अ‍ॅन्टिजेन अशा एकूण ६,१६५ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. याातून ५,४१९ रुग्ण निगेटिव्ह आले. अ‍ॅन्टिजेन चाचणीतून १९० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणी झालेल्या एम्समधून ८९, मेडिकलमधून २६, मेयोमधून ८८, माफसूमधून २९, नीरीमधून ६४ तर खासगी लॅबमधून २६० रुग्ण पॉझिटिव्ह आले.८४ हजारांमधून आता ९ हजार रुग्णच अ‍ॅक्टिव्ह८४ हजार बाधितांच्या एकूण संख्येच्या तुलनेत सध्या ९,४८९ रुग्णच अ‍ॅक्टिव्ह म्हणजे उपचाराखाली आहेत. शहरात ५८,१८४ रुग्ण बरे झाले असून ६,४४६ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. ग्रामीणमध्ये १४,४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आता ३,०४३ रुग्ण उपचार घेत आहेत. आज १,०१२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.६० टक्क्यांवर गेले आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,१६५बाधित रुग्ण : ८४,८२७बरे झालेले : ७२,६१४उपचार घेत असलेले रुग्ण : ९,४८९मृत्यू : २,७२४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर