CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५ दिवसात कोरोनाचे ७०२ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:22 IST2020-09-15T23:21:18+5:302020-09-15T23:22:23+5:30
कोरोनाचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या १५ दिवसात ७०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे भीतीचे संकट आणखीच गडद झाले आहे. दुसरीकडे नवीन रुग्णांचीही दररोज मोठी भर पडत आहे. मंगळवारी १९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४८ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५५४३० झाली असून मृतांची संख्या १७५३ वर पोहचली आहे.

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५ दिवसात कोरोनाचे ७०२ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या १५ दिवसात ७०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे भीतीचे संकट आणखीच गडद झाले आहे. दुसरीकडे नवीन रुग्णांचीही दररोज मोठी भर पडत आहे. मंगळवारी १९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४८ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५५४३० झाली असून मृतांची संख्या १७५३ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर ३.१६ टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आज शहरात १७०५, ग्रामीणमध्ये २४६ तर जिल्हाबाहेर सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत शहरात एकूण रुग्णांची संख्या ४३९६२ झाली आहे. ग्रामीणमध्ये १११२९ तर जिल्हाबाहेर ३३९ रुग्णांची नोंद आहे. आज आरटीपीसीआरच्या ३३८७ तर रॅपिड अॅन्टिजनच्या २९३४ असे एकूण ६३२१ चाचण्या झाल्या. रॅपिड अॅन्टिजन चाचणीतून ६९५ रुग्ण पॉझटिव्ह आले व २२३९ रुग्ण निगेटिव्ह आले, तर आरटीपीसीआर चाचणीतून १२५२ रुग्णांची नोंद झाली व २०३१ रुग्ण निगेटिव्ह आले.
शहरात १३२१ तर ग्रामीणमध्ये २७५ मृत्यू
आज जिल्हात नोंद झालेल्या मृतांमध्ये शहरातील २९, ग्रामीण भागातील १३ तर जिल्हाबाहेरील सहा मृत्यू आहे. एकूण मृतांमध्ये शहरातील १३२१, ग्रामीणमधील २७५ तर जिल्ह्याबाहेरील १५७ आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने भीतीचे वातावरण आहे. मृतांमध्ये सर्व वयोगटातील रुग्ण असलेतरी ५० ते ७० या वयोगटातील सर्वाधिक आहेत. वाढते वय, जुनाट अनियंत्रित आजार आणि रुग्णालयात पोहचण्यास उशीर, हे तीन कारण मृत्यूची संख्या वाढवित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
बरे होण्याचे प्रमाण ४६ वरून ७६ टक्क्यांवर
एकीकडे रुग्ण व मृत्यूची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण ७६.३७ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, १६ आॅगस्ट रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी, ४६.७४ टक्क्यांवर होते. यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज १६६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण ४२३३३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ११३४४ रुग्ण उपचाराखाली आहेत.- शासकीयमध्ये १७२३ तर खासगीमध्ये १५७० चाचण्या शासनाच्या पाच प्रयोगशाळामिळून आज १७२३ तर खासगी लॅबमध्ये १५७० रुग्णांच्या चाचण्या झाल्या. धक्कादायक म्हणजे, शासकीय प्रयोगशाळेतील रोजच्या चाचण्यांची क्षमता २५००वर आहे. तरीही कमी तपासण्या होत आहे तर, खासगीची क्षमता याच्या तुलनेत निम्मी असताना सर्वाधिक चाचण्या होत आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत १५५, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ६१९, मेयोच्या प्रयोगशाळेत १४५, नीरीच्या प्रयोगशाळेत १८३ तपासण्या झाल्या.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६२२७
बाधित रुग्ण : ५५४३०
बरे झालेले : ४२३३३
उपचार घेत असलेले रुग्ण : ११३४४
मृत्यू :१७५३