CoronaVirus in Nagpur : ४३६ नवीन पॉझिटिव्ह, ३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 22:59 IST2020-12-16T22:58:00+5:302020-12-16T22:59:16+5:30
Corona Virus in Nagpur नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक कोरोनाचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. परंतु मृतांची संख्या मात्र कमी होत आहे.

CoronaVirus in Nagpur : ४३६ नवीन पॉझिटिव्ह, ३ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक कोरोनाचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. परंतु मृतांची संख्या मात्र कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ४३६ नवीन पॉझिटिव्ह मिळाले व ३ जणांचा मृत्यू झाला तर २३१ रुग्ण बरे होऊ घरी गेले. आतापर्यंत १,०८,५५५ रुग्ण बरे झालेले आहेत.
बुधवारी सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ३४९, ग्रामीणमधील ८६ आणि १ बाहेरचा आहे. मृतांमध्ये २ शहरातील व एक जिल्ह्याबाहेरचा आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण १,१८,३४७ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३८१६ झाली आहे. गेल्या २४ तासात ५९२० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ४४२८ आणि ग्रामीणमधील१४९२ नमुने होेते. आतापर्यंत ८ लाख ६६ हजार ९३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे.
ॲक्टिव ५९७६
बरे झालेले- १,०८,५५५
मृत - ३८१६