शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

CoronaVirus in Nagpur : नागपुरात २४ तासात १,९३४ रुग्ण, ५८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:40 IST

कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे १,५१३ रुग्ण बरे : शहरात १,४५० तर ग्रामीणमध्ये ४७८ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १,४५०, ग्रामीणमधील ४७८ तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्ण आहेत. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली असली तरी रुग्ण बरे होण्याचा दर ७१ टक्क्यांवर गेल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. नागपूर जिल्हात मागील काही दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या १७०० ते २००० च्या घरात जात आहे. यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण रुग्णसंख्या एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, रोज ४० ते ५० मृत्यूची नोंद होत असल्याने एकूण मृत्यूची संख्या तीन हजारावर जाण्याचीही शक्यता आहे. आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत शासकीय व खासगी रुग्णालयांची व्यवस्था तोकडी पडत आहे. रात्री ७ नंतर खासगी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत सापडले आहेत.खासगी लॅबवर वचक कुणाचा?गुरुवारी खासगी लॅबमधून ६९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सूत्रानुसार, काही लॅब क्षमतेपेक्षा जास्त नमुने गोळा करीत असल्याने व अहवाल देण्यास २४ तासांपेक्षा जास्त वेळ लावत आहेत. उशिरा अहवालामुळे रुग्णांची जोखीम वाढत आहे. या लॅबवर वचक कुणाचा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.३,०३३ अ‍ॅन्टिजन चाचणीतून ६७० पॉझिटिव्हशहर आणि ग्रामीण मिळून ३,०३३ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ६७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, ३,६७८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात एम्स प्रयोगशाळेमधून १७, मेडिकलमधून १९७, मेयोमधून २०१, माफसूमधून ५७, नीरीमधून ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शासकीय, खासगी कोविड हॉस्पिटल, कोविड के अर सेंटरमध्ये ५,१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह अलगीकरण कक्षात ६,७२८ रुग्ण आहेत.१५१३ रुग्ण झाले बरेआज विविध रुग्णालयांतून १,५१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील १,३४२ तर ग्रामीणमधील १७१ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ३३,०७९ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील २६,६४९ तर ग्रामीणमधील ६,४३० रुग्ण आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७१.१५ टक्क्यांवर पोहचले आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,२७१बाधित रुग्ण : ४६,४९०बरे झालेले : ३३,०७९उपचार घेत असलेले रुग्ण : ११,८९५मृत्यू : १,५१६

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर