तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागपुरात कोरोना नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 21:09 IST2020-05-29T21:08:25+5:302020-05-29T21:09:30+5:30
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहते. मुंढे हुकूमशाही करतात, असा आरोप त्यांनी केला असताना आम आदमी पक्षाने मात्र त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणात आहे. दोन्ही पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी अशी भूमिका घेतली आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागपुरात कोरोना नियंत्रणात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहते. मुंढे हुकूमशाही करतात, असा आरोप त्यांनी केला असताना आम आदमी पक्षाने मात्र त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणात आहे. दोन्ही पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी अशी भूमिका घेतली आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे.
कोरोनामुळे मोठमोठ्या शहरांत स्थिती गंभीर असताना नागपूरचा रोगमुक्तता दर ८२ टक्के आहे. मुंढे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन केले. या स्थितीत कठोर निर्णय आवश्यकच आहेत. मात्र काँग्रेस, भाजपला मुंढे यांचा प्रामाणिकपणा भावलेला नाही. या दोन्ही पक्षांनी मनपा सभेत आयुक्तांविरोधात प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला आहे. परंतु ही भूमिका जनविरोधी असून वेळ आली तर आम्ही जनतेला सोबत घेऊन आंदोलन करू, असा इशारा आपच्या नागपूर संयोजक कविता सिंघल यांनी दिला आहे.