शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रुग्णालयातून पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आज शनिवारी सकाळी ७ वाजता ...

नागपूर : मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आज शनिवारी सकाळी ७ वाजता पळून गेल्याने खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेऊन हिंगणघाट येथील घरी त्याला पकडण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा कोविड हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हिंगणघाट, मानगाव, कोपरा येथील रहिवासी असलेला या रुग्णाला डोक्याला जबर मार बसल्याने २६ फेब्रुवारी रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. ३ मार्च रोजी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परंतु, काही दिवसांनी बोलण्यात स्पष्टता नसल्याने तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. याच दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. यामुळे १२ मार्च रोजी पहाटे १ वाजता कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. १३ मार्च रोजी पहाटे ७ वाजता सुरक्षारक्षकांच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला. सकाळी राउंडवर असलेल्या डॉक्टरांच्या लक्षात ही बाब येताच त्याचा शोध घेतला. परंतु, कुठेच आढळून न आल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला. पोलिसांना रुग्ण हा हिंगणघाट येथील घरीच सापडला. मेडिकल ते हिंगणघाट त्याने कशाने प्रवास केला, त्याच्या संपर्कात कोण आले, याचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन केले जाणार आहे. चार ते पाच दिवसांनंतर त्यांचीही कोरोनाची तपासणी केली जाईल, अशी माहिती संबंधित आरोग्य अधिका-यांनी दिली.

-रुग्णालयातून पळून जाणे, गुन्हा दाखल होणार

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने रुग्णालयातून पळून जाणे हा गुन्हा आहे. या बाबत रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात केली जाईल. समाजासाठी धोकादायक ठरणा-या अशा रुग्णांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.

-डॉ. अविनाश गावंडे,

वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल