पालकमंत्र्यांच्या कार्यालयात कोरोना : राऊत यांची रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 00:15 IST2020-09-03T00:12:59+5:302020-09-03T00:15:10+5:30
कोविड १९ च्या संसर्गादरम्यान पालकमंत्र्यांच्या कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल यांची रिपोर्ट आज निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

पालकमंत्र्यांच्या कार्यालयात कोरोना : राऊत यांची रिपोर्ट निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड १९ च्या संसर्गादरम्यान पालकमंत्र्यांच्या कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल यांची रिपोर्ट आज निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
राऊत यांच्या कार्यालयाशी संबंधित ४ लोकांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही मंडळी पालकमंत्र्यांशी अगदी जवळून संबंधित आहेत. त्यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पालकमंत्र्यांनीही आपली एंटीजेन टेस्ट केली. नंतर पुन्हा आरटी आरपीएस टेस्ट सुद्धा करण्यात आली. आज त्यांचे पूत्र कुणाल यांची रिपोर्टही निगेटिव्ह आली. यादरम्याम मंगळवारी व बुधवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कुठलीही बैठक झाली नाही. पालकमंत्री लवकरच विधिमंडळाच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मुंबईला रवाना होतील.