शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन तीन आठवड्यांचे

By admin | Updated: December 2, 2015 02:56 IST

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशन यंदा तीन आठवडे चालणार आहे.

२३ तारखेपर्यंतचे कामकाज निश्चित : पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशन यंदा तीन आठवडे चालणार आहे. ७ ते २३ डिसेंबरपर्यंतचे कामकाजही निश्चित झाले झाले आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव सादर करण्यात येईल. सोमवार ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. विधिमंडळ सचिवालयातर्फे २३ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव सादर करण्यात येईल. ८ डिसेंबर रोजी अध्यादेश सभापटलावर ठेवण्यात येतील. सन २०१५-१६ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. शासकीय विधेयके आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. ९ डिसेंबर रोजी शासकीय विधेयकासह विरोधी पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. ११ डिसेंबरला अशासकीय ठराव होतील. १२ आणि १३ डिसेंबर रोजी सुटी राहील. १४ डिसेंबरपासून दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होईल. या दिवशी पुरवणी मागण्यांवरील चर्चा होईल. १५ डिसेंबरला पुरवणी मागण्यांवरील चर्चेचा समारोप होईल आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव येईल. १६ डिसेंबरला विधानसभेत महामंडळाच्या अहवालावर चर्चा होईल. तर परिषदेमध्ये निवृत्त सदस्यांना निरोप दिला जाईल. १७ डिसेंबरला शासकीय विधेयके आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. १८ डिसेंबरला शासकीय विधेयके व अशासकीय कामकाज होईल. १९ डिसेंबरला बैठक होणार नाही. २० ला सुटी, २१ डिसेंबरपासून तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होईल. या दिवशी शासकीय विधेयके सादर केली जातील. २२ डिसेंबरला अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाईल आणि २३ डिसेंबरला पुन्हा शासकीय विधेयके सादर केली जातील. (प्रतिनिधी)