शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत वादग्रस्त विधान; भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 5:56 PM

AR Chowdhury on Draupadi Murmu : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींविरोधात नागपुरात भाजपचे आंदोलन

नागपूर : काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकारण तापलं आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्दप्रयोग चौधरी यांनी केला होता. चौधरी यांच्या या शब्दानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.  नागपुरात भाजप युवा मोर्चाने अधीर रंजन चौधरी  यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला. भाजपने काँग्रेसवर टीका करत चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी केली. नगपुरात भाजपकडून चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. राजे बख्त बुलंदशहा चौकात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेस विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, चौधरी यांच्या या शब्दानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली असून, पक्षाध्यक्ष सोनिय गांधी यांनीही माफी मागण्याची मागणी केली. तर, या प्रकरणावर चौधरी यांनी आपली बाजू मांडली आहे, ''मी भारताच्या राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा विचारही कधी करू शकत नाही. माझ्याकडून चूक झाली. राष्ट्रपतींना याबाबत वाईट वाटले असेल तर मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटेन आणि माफी मागेन,'' असे चौधरी म्हणाले. 

'...तर फासावर लटकवा'

ते पुढे म्हणाले की, "बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चुकून राष्ट्रपतींचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख झाला. एकदा चूक झाली तर मी आता काय करू? यावरुन मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण याप्रकरणात आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ओढू नका. त्यांचा यात काहीही संबंध नाही,'' अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. 

टॅग्स :PoliticsराजकारणDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूcongressकाँग्रेसBJPभाजपाagitationआंदोलन