शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कादंबरी बलकवडे यांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जिल्हा परिषदेमधील फर्निचर घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जिल्हा परिषदेमधील फर्निचर घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांना अवमानना नोटीस बजावली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

उच्च न्यायालयाने १३ जुलै २०१७ रोजी सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांची यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढताना बलकवडे यांना स्वत: घोटाळ्याची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. चौकशी पूर्ण करण्यासाठी त्यांना तीन महिन्याचा वेळ देण्यात आला होता. तसेच, चौकशीच्या अहवालाची प्रत याचिकाकर्ते कारेमोरे यांनाही देण्यास सांगितले होते. बलकवडे यांनी त्या आदेशाची पायमल्ली केली असा कारेमोरे यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी बलकवडे यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. बलकवडे यांनी या घोटाळ्याची स्वत: चौकशी केली नाही. घोटाळ्याचा आरोप असलेल्या कार्यकारी अभियंता निता ठाकरे यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली. या समितीने घोटाळा झाला नसल्याचा अहवाल दिला. ही चौकशी बेकायदेशीर व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे. करिता, बलकवडे यांच्यावर अवमानना कारवाई करण्यात यावी, असे कारेमोरे यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने बलकवडे यांना या आरोपांवर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी चार आठवड्याचा वेळ दिला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मनोजकुमार मिश्रा यांनी बाजू मांडली.

--------------

असे आहे प्रकरण

रविभवनपुढे जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. २०११-१२ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्ष, लेखाधिकाऱ्याचे कार्यालय यासह विविध विभागांतील फर्निचरचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, फर्निचर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू चढ्या दराने खरेदी करण्यात आल्या. २६ नोव्हेंबर २०१४ व १८ डिसेंबर २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाची कामे करायची असल्यास ई-टेंडर प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. परंतु, जिल्हा परिषदेने या निर्णयाचे पालन केले नाही असा कारेमोरे यांचा आरोप आहे.