शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

मेट्रो स्टेशनचे बांधकाम सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 02:46 IST

वर्धा रोडवर प्रस्तावित नवीन विमानतळजवळ मेट्रो स्टेशन बनविण्याचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे.

नवीन विमानतळ व खापरीत स्टेशन : मेट्रोने विमानतळाला जोडणार वसीम कुरैशी नागपूर वर्धा रोडवर प्रस्तावित नवीन विमानतळजवळ मेट्रो स्टेशन बनविण्याचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. या कामासाठी आयएलएफएस कंपनीला पूर्वीच कंत्राट आणि दोन आठवड्यापूर्वी कार्यादेश मिळाले आहेत. खापरी ते काँग्रेसनगर दरम्यानच्या कामासाठी कंपनीची पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक मशीन आणि संशोधन उपलब्ध करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मेट्रो रेल्वे सुरू होण्याचे वक्तव्य अलीकडेच केले आहे. मेट्रो रेल्वे वर्धा रोडवर ५.६ कि़मी. जमीन मार्गावर धावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कामात अडथळा येऊ नये म्हणून नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) आणि कंत्राट मिळालेली कंपनी तयारी करीत आहे. काहीच समस्या नाही वर्धा रोडवर मेट्रो स्टेशनचे काम सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हे काम पावसामुळे पुढील महिन्यात सुरू होणार आहे. सुरुवात खापरी व प्रस्तावित नवीन विमानतळाच्या मेट्रो स्टेशनपासून होईल. विमानतळाच्या समोरील स्टेशन जमिनीपासून वर राहील. त्यामुळे विमानतळाला एफओबी, स्कॉय वॉक अथवा ट्रॅव्हलेटरने जोडले जाईल, असे कंपनीचे उपमहाव्यवस्थापक शिरीष आपटे यांनी सांगितले. एकाच तिकिटावर सर्व जागेची कनेक्टिव्हिटी मेट्रो रेल्वे प्रकल्पात मनपाचा सहभाग आहे. त्यामुळे प्रवाशांना अखेरच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. सिटी बस, बॅटरीवर चालणारी कार आणि खासगी टॅक्सी कंपन्यासोबत काम सुरू आहे. मेट्रोच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशाला एकाच तिकिटावर बस वा कारमध्ये प्रवास करून घरी जाता येईल. प्रत्येक ठिकाणी भाडे देण्याची गरज राहणार नाही. तसेच मुख्य रेल्वे स्टेशन व अजनी रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी अन्य कोणत्याही साधनांची मदत घ्यावी लागणार नाही. विमानतळासमोरील पुलावर राहणार स्टेशन खापरी व प्रस्तावित नवीन विमानतळासमोरील पुलावर मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहे. वर्धा रोड ते विमानतळाला जोडणाऱ्या अ‍ॅप्रोच रस्त्यालगत राहणार आहे. स्टेशनला विमानतळाला जोडण्याच्या विविध पैलूंवर चर्चा सुरू आहे. या स्टेशनपासून विमानतळापर्यंत स्कायवॉक, एफओबी अथवा ट्रॅव्हलेटर बनविण्याची योजना आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यास प्रवासी मेट्रो रेल्वेद्वारे टॅक्सीविना थेट विमानतळावर पोहोचणार आहे. याशिवाय त्यात लिफ्टची योजना आहे. याशिवाय सुरक्षा मुद्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या संदर्भात सीआयएफ, एएआय, पोलीस आणि अन्य एजन्सीसोबत चर्चा सुरू आहे.