शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या यात्रा निरर्थक, समर्थन मिळत नाही- चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:07 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.

आनंद डेकाटे, नागपूर: काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता रिकामे आहेत. राहुल गांधी यांना यात्रेची सवय आहे. काँग्रेस शेतकरी आत्मसन्मान यात्रा काढत आहे. मात्र कॉंग्रेसच्या यात्रा निरर्थक असतात. त्याला समर्थन मिळत नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते रविवारी प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, दिवसाला बारा तास वीज आम्हाला शेकऱ्यांना पुढच्या तीन वर्षात द्यायची आहे. शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते बांधत आहोत. पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देत आहे.असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. आता कॉंग्रेसकडे सांगण्यासारखे काही शिल्लक नाही. ६५ वर्षात त्यांनी काय केलं सांगता येत नाही. जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची पोळी शेकण्यासाठी यात्रा काढल्या जातात,असे बावनकुळे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये दिले ते सर्व केंद्र सरकार पूर्ण करीत आहे.काँग्रेसने त्यांच्या ६५ वर्षाच्या काळात जे करू शकले नाही ते सर्व महाराष्ट्रातील महायुतीचे डबल इंजिन सरकार मार्गी लावत आहे.

सरकार बदलले, मंत्री बदलले तरी त्यांचे ओसडी, स्वीय सहाय्यक बदलत नाही. तेव्हा त्या सरकारच्या अजेंडावर काम करणारा अधिकारी आले पाहिजे आणि अधिकारी जे अनेक वर्ष एकाच ठिकाणी आहे त्यांनी फिल्डवरही काम केले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवर नाराजी नाहीभारतीय जनता पक्षाने निवडलेल्या जिल्हाध्यक्षांबाबत कुठलीही नाराजी नाही आहे. सर्व जिल्हाध्यक्षांची निवड कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करण्यात आल्या आहेत. एका जागेसाठी चार जण इच्छुक असतात. त्यामुळे नाराजी वाटते.पण तसे नाही.ज्यांची नाराजी आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या मंडळामध्ये सामावून घेणार आहे, असे बावनकुळे म्हणाले. केंद्र सरकारने नक्षलवाद मोडून काढण्याचा संकल्प केला आहे गृहमंत्री एक कणखर आहेत अशा कुठल्याही धमक्यांना सरकार भीक घालणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर