शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

नागपुरात ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा; मंत्री विजय वडेट्टीवारांना पोलिसांनी ताब्यात घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 15:40 IST

Congress protests outside ED office : नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे ईडी कार्यालयाच्या गेटवर चढले, पोलिसांनी त्यांना खाली खेचले व इथूनच तणाव सुरू झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली.

ठळक मुद्देनागपुरात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक

नागपूर : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकले असून वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना ताब्यात घेतले असून आमदार अभिजित वंजारी गिरीश पांडव यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. राहुल गांधींची सुटका होईपर्यंत आम्ही हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

राहुल गांधी यांना नोटीस पाठवून भाजप घाबरली आहे, हे सिद्ध झाले आहे. आता संघर्षाची सुरुवात झाली असून यांना सत्तेतून खाली घेतल्याशिवाय थांबणार नाही, अशी जोरदार टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. तर, आता आम्ही रस्त्यावर उतरले आहोत अटक झाली तरी थांबणार नाही, घाबरणार नाही, असा इशारा उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. ईडी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त असून पोलीस ॲक्शनमध्ये आले आहेत. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावला. याच्या निषेधार्थ नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर कूच केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी कार्यालयाचे गेट बंद केले असता नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे कार्यालयाच्या गेटवर चढले, पोलिसांनी त्यांना खाली खेचले व इथूनच वातावरण चिघळले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात घेता पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली. यावेळी नेते पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार अभिजित वंजारी गिरीश पांडव यांना ताब्यात घेण्यात आले असून वातावरण चांगलेच तापले आहे. 

दरम्यान, 'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास एजन्सीने यापूर्वी राहुल गांधींना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगून हजर राहण्यासाठी आणखी दिवसांची मुदत मागितली. याच प्रकरणी तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना ८ जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने वेळ मागितला आहे.

टॅग्स :Politicsराजकारणagitationआंदोलनcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnagpurनागपूरNitin Rautनितीन राऊतVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार