शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

पूर्व व दक्षिण नागपूर बचावसाठी काँग्रसचे पथक दुसऱ्यांदा दिल्लीत

By कमलेश वानखेडे | Updated: October 25, 2024 18:39 IST

Amravati : विकास ठाकरे, अभिजित वंजारी आदींनी घेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपूर तसेच दक्षिण नागपूर काँग्रेसकडेच कायम ठेवावे, या मागणीसाठी शहरातील काँग्रेस नेत्यांचे पथक शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. आम्ही मित्रपक्षांचा सन्मान करतो पण वास्तविकता पाहून निर्णय घ्या, नागपूर शहरातील काँग्रेसच्या जागा कमी करू नका, अशी विनंती ज्येष्ठ नेत्यांना भेटून करण्यात आली.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यासह आ. अभिजित वंजारी, उमाकांत अग्नीहोत्री, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, प्रसन्ना तिडके, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, ॲड. आसिफ कुरेशी आदींनी दिल्ली गाठली. सर्वप्रथम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व के.सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. या भेटीत दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसच्या कोट्यात सुटली असल्याचे समजत आहे, पण कुठल्याही परिस्थतीत यात बदल होऊ देऊ नका, अशी विनंती नेत्यांना करण्यात आली. पूर्व नागपूरबाबत २०१४ व २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी मांडण्यात आली. २०१४ मध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढली असता दखलपात्र मते मिळाली नाहीत. २०१९ मध्ये काँग्रेसने येथे ८० हजारावर मते घेतली आहेत. त्यामुळे ही जागा यावेळीही काँग्रेसला लढू द्यावी, अशी विनंती करण्यात आली. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यापासून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत की काँग्रेस हायकमांडकडे एबी फॉर्म मागा व पक्षाचा उमेदवार लढवा. आम्हाला भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांना पराभूत करायचे आहे, अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचेही सांगण्यात आले. 

या भेटीत काँग्रेस नेत्यांनी दक्षिणची जागा काँग्रेसच लढेल, असे स्पष्ट केले. तर पूर्व नागपूरबाबत आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू, असे आश्वस्त केल्याचा दावा दिल्ली गाठणाऱ्या काँग्रेसच्या पथकाने केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसnagpurनागपूरVikas Thakreविकास ठाकरेAbhijit Wanjariअभिजीत वंजारी