निष्ठावंत व यंग ब्रिगेडसह काँग्रेसची टीम मैदानात
By Admin | Updated: August 19, 2016 02:31 IST2016-08-19T02:31:07+5:302016-08-19T02:31:07+5:30
२४१ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शहर काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली.

निष्ठावंत व यंग ब्रिगेडसह काँग्रेसची टीम मैदानात
शहर कार्यकारिणी जाहीर : सहाही विधानसभेत प्रतिनिधित्व
नागपूर : २४१ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शहर काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली. आगामी महापालिका निवडणुकीचे आव्हान पाहता या कार्यकारिणीत जुन्या निष्ठावंतांना महत्वाचे पद देऊन सन्मान करण्यात आला असून नव्या दमाच्या यंग ब्रिगेडला संधी देत काम करणाऱ्यांची दखल घेण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक यासह विविध क्षेत्रातील कर्तबगार लोकांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असून सहाही विधानसभेला प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. काँग्रेसपासून दुरावलेल्यांना स्थान देऊन त्यांचीही घरवापसी करण्यात आली आहे.
कार्यकारिणीत जुन्या व नवीन कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात पक्षाचे तीन निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक बूथची जबाबदारी १५ कार्यक र्त्यांवर सोपविण्यात आली आहे. हे पदाधिकारी फक्त कागदोपत्री नसतील तर महापालिकेच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची निवड करताना या सर्वांची मते विचारात घेतली जातील. प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात तीन ब्लॉक अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत, असे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष : विकास ठाकरे, कोषाध्यक्ष : मनोज गोलावार, उपाध्यक्ष -दीपक वानखेडे, दर्शना धवड, संजय सरायकर, किशोर जिचकार, ईश्वर बरडे, गुरुप्रित सिंग खंडुजा, राजेश नगरकर, अशोक इंगोले, यशवंत कुंभलकर, जयंत लुटे, विलास भालेकर, सुरेश चौधरी, संजय बांद्रे, नरेश सिरमवार, मनोज साबळे, किरण गडकरी, हरी नायर, जितेंद्र हावरे, अनंता धोटे, राजू व्यास, अविनाश मैनानी, राजेंद्र नंदनकर, बाबूराव वंजारी, भास्कर चाफले, कृष्णा गोटाफोडे, रत्नाकर जयपूरकर, प्रभाकर खापरे, तुफैल अशर, फिरोज खान, दिनेश बानाबाकोडे, जुल्फेकार अहमद भुत्तो, अशरफ खान, रमेश पुंड, सुभाष खोडे, डॉ. सूर्यकांत भगत, उमाकांत जट्टेवार, उमेश शाहू, अब्दूल हमीद लिडर, ठाकूर जग्यासी, हरिभाऊ किरपाने, गीता श्रीवास, शेषराव वासनिक, रवी कोटाल, बंडोपंत टेंभुर्णे.
महासचिव :हरीश ग्वालबंशी, संजय चौधरी, संजय किनखेडे, संदेश सिंगलकर, नितीश ग्वालबंशी, अजय हिवरकर, प्रशांत कापसे, किशोर उमाठे, असिफ जावेद, अंज्युम कय्यूम, सुमुख मिश्रा, विक्रम पनकुले, प्रशांत गोतमारे, अरविंद वानखेडे, परमेश्वर राऊ त, श्र्रीकांत कैकाडे, संघपाल मेश्राम, छोटू निर्मलकर, नाना झोडे, दयाशंकर गिल्लोर, यशवंत मेश्राम, राजेश नंदनवार, अरिफ पल्ला, प्रसन्ना जिचकार, रिंकू जैन, निसार गायधने, अशोक निखारे, हसमुख सागतानी, नितीन गौर, राजू महाजन, विजय बाभरे, वीणा बेलगे, डॉ. गजराज हटेवार, संजय झाडे, नियामतखान ताजी, राजू भोतमांगे, विलास बांगरे, संजय दुबे, जयंत जांभुळकर, रवींद्र सिंग राणा, मन्सूर खान, मार्टिन मोरेश, डॉ. दयाल जशनानी व चंद्रकांत बडगे.
सचिव : चंद्रकांत वासनिक, रमेश घाटोळे, कुसुमताई घाटे, मुन्ना वर्मा प्रशांत ठाकरे, राजेश अरोरा, इंद्रसेन ठाकूर, प्रमोद ठाकूर, नागेश राऊ त, स्वप्नील फातोडे, विजय चिटमिटवार, गीता काळे, सदन यादव, नरेश सावरकर, कमलेश लारोकार, राकेश पन्नासे, पंकज दळवी, प्रवीण पवार, मनीष चांदेकर, निखील धांदे, अर्चना बडोले, अनिता ठेंगरे, हरीश खंडाईत, अंगद हिरोंदे, विजय वनवे, इर्शाद अली, मिलिंद दुपारे, विजय पखाले, गोलू गुप्ता, अंकुश भोवते, रवी खंते, लोकेश नरडिया, शशी समर्थ, गोपाल पट्टम, नज्जू करिमी, अश्फाक अल रमझान अली, विक्रम भोसले, रंजीता रहाटे, प्रवीण पोटे, विजय कदम, डॉ. निशिकांत मोरे, अशोक यावले, राजेश कडू, मिलिंद सोनटक्के, मिलिंद चवरे, खुशाल हेडाऊ , डॉ. निहाज अंसारी, दौलत कुंगवानी, अॅड. अवतारसिंग जब्बल, पंकज लोणारे व विवेक निकोसे.