काँग्रेसचे सदस्य नाराज, समन्वयासाठी जि.प. अध्यक्षांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:11 AM2021-09-15T04:11:38+5:302021-09-15T04:11:38+5:30

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांची नाराजी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त होत आहे. पदाधिकारी आमचे ऐकतच नाहीत, सदस्यांची ...

Congress members angry, ZP for coordination. President's rush | काँग्रेसचे सदस्य नाराज, समन्वयासाठी जि.प. अध्यक्षांची धावपळ

काँग्रेसचे सदस्य नाराज, समन्वयासाठी जि.प. अध्यक्षांची धावपळ

Next

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांची नाराजी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त होत आहे. पदाधिकारी आमचे ऐकतच नाहीत, सदस्यांची कामे होत नाहीत, विरोधी सदस्य पदाधिकाऱ्यांच्या जवळचे झाले आहेत, असा सदस्यांचा सूर आहे. जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये असंतुष्टांची फळी तयार झाली आहे. वरिष्ठांपर्यंत ही सर्व धुसफूस पोहोचली आहे. अशात निवडणुका लागल्या असून, असंतुष्टांची नाराजी निवडणुकीत अवघड ठरू नये म्हणून अध्यक्षांनी समेट घडवून आणण्यासाठी काँग्रेस सदस्यांची बैठक बोलावली होती.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विरोधकांची नव्हेतर, सत्तेतील सदस्यांची भीती वाटायला लागली आहे. नाराज सदस्यांचा एक ग्रुप तयार झाला आहे. हे सदस्य उघडपणे आपली नाराजी व्यक्त करीत नसले तरी संधी मिळाली तर आपली भडास नक्कीच काढत आहेत. एका ऑनलाइन सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ महिला सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या परिणामाची जाणीव त्यांना लगेच झाली. त्या व्यक्त होत नसल्या तरी एक खदखद आहेच. पारशिवनीत जि.प. सदस्य आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याची झालेली हातापायी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर झालेली कारवाई यातून मोठी नाराजी पक्षात पसरली आहे. पॉलिमर दप्तर खरेदी, चर्चेतील विषय इतिवृत्तातून गायब होणे, ग्रामसेवकाची पदोन्नती, नवीन उपाध्यक्षाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार या सर्व विषयाला सत्ताधारी सदस्यांनीच खतपाणी घातले. निवडणुकीच्या तोंडावर हे विषय आणखी पेटू नयेत म्हणून सर्व नाराजांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केला. सरपंच भवनात सदस्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी निस्तरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.

- अनेकांची बैठकीला अनुपस्थिती

बैठकीसंदर्भात सर्वच सदस्यांना अध्यक्षांकडून सूचना देण्यात आली होती. असे असतानाही काही सभापतींसह अनेक सदस्य बैठकीला अनुपस्थित होते. प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, मिलिंद सुटे, महेंद्र डोंगरे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याह १० ते १२ सदस्यांनीच बैठकीला उपस्थिती लावली.

- भाजपची झाली अंतर्गत बैठक

भाजपनेही निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा तयार केला आहे. ओबीसींवरील झालेल्या अन्यायाचा मुद्दा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. उमेदवारांनी जनसंपर्क वाढवावा, असा सल्ला पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारांना दिला.

Web Title: Congress members angry, ZP for coordination. President's rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.