शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 18:53 IST

नरेंद्र मोदी हे सगळे प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत. मात्र तुम्ही कशालाही भुलू नका, असं खरगे म्हणाले.

Mallikarjun Kharge  Vs Narendra Modi ( Marathi News ) :काँग्रेसने आज स्थापना दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात महासभेचं आयोजन केलं होतं. या महासभेतील भाषणातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरूनही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. "देशात महागाई, बेरोजगारी असे लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे सगळे प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत. मात्र तुम्ही कशालाही भुलू नका. देशाला वाचवण्यासाठी, संविधान आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी तुम्हाला इंडिया आघाडीला मत द्यायचं आहे," असं आवाहन खरगे यांनी आपल्या भाषणातून केलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "मणिपूरमध्ये हिंसाचारात लहान मुलं मरत आहेत, स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. मात्र तिथं नरेंद्र मोदी जात नाहीत. हेच मोदी गुजरातमध्ये मात्र डायमंड व्यापाराचं उद्घाटन करायला जात आहेत. संसद सोडून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बाहेर फिरत आहेत. भाजपच्या एका खासदाराच्या पासवर तरुणांनी संसदेत घुसखोरी केली. मात्र या एका खासदाराला वाचवण्यासाठी मोदींनी विरोधकांच्या १४६ खासदारांचं निलंबन केलं. ही लोकशाही आहे का?" असा सवाल खरगेंनी विचारला आहे.

"नरेंद्र मोदी ही सर्वाधिक खोटं बोलणारी व्यक्ती आहे. देशात दरवर्षी ५ कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. तसंच सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येतील, असं म्हणाले होते. मात्र एकही आश्वासन पाळलं नाही," असा हल्लाबोलही मल्लिकार्जुन खरगेंनी केला आहे.

"इंडिया आघाडीला तोडण्याचा डाव"

"इंडिया आघाडीतून आम्ही सगळे पक्ष भाजपविरोधात एकत्र आलो आहेत. आमच्या एकजुटीमुळे भाजप तुम्हाला कुठेही दिसणार नाही. त्यामुळेच आता इंडिया आघाडीला फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडिया आघाडीतील विविध पक्षांना दबावाचा वापर करून वेगळं करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप आजच्या सभेतून मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर केला आहे. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिर