शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपुरात काँग्रेसने दिले धरणे : ‘राफेल’ खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 21:06 IST

यूपीए सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीसाठी प्रति विमान ५२६ कोटी रुपयांचा करार झाला होता. परंतु भाजपा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण तज्ज्ञांना न घेता अनिल अंबानी यांना फ्रान्समध्ये घेऊन गेले आणि त्यांनी फ्रान्स सरकारवर दबाब टाकून यूपीए राजवटीत ठरलेली ५२६ कोटींची किंमत वाढवून १६७० कोटी करून आकस्मिक करार केला. असा सुमारे ४१ हजार कोटींचा घोटाळा राफेल विमान खरेदीत झाल्याचा आरोप अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केला.

ठळक मुद्देकेंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूपीए सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीसाठी प्रति विमान ५२६ कोटी रुपयांचा करार झाला होता. परंतु भाजपा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण तज्ज्ञांना न घेता अनिल अंबानी यांना फ्रान्समध्ये घेऊन गेले आणि त्यांनी फ्रान्स सरकारवर दबाब टाकून यूपीए राजवटीत ठरलेली ५२६ कोटींची किंमत वाढवून १६७० कोटी करून आकस्मिक करार केला. असा सुमारे ४१ हजार कोटींचा घोटाळा राफेल विमान खरेदीत झाल्याचा आरोप अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केला.राफेल विमान घोटाळा जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसतर्फे बुधवारी संविधान चौकात धरणे देत निदर्शने करण्यात आली. यावेळी अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक,माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष अनंतराव घारड, बाबूराव तिडके, नाना गावंडे, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोढे, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.यावेळी वासनिक म्हणाले, अवध्या १० दिवसात नोंदणी झालेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला या कामाचा काहीही अनुभव नसतानाही राफेल विमानाचा कंत्राट देण्यात आला. यात उघडउघड मोठा भ्रष्टाचार आहे. याची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी त्यांनी केली.आंदोलनात डॉ.गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे,उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, जयंत लुटे, अशोकसिंग चव्हाण,संजय महाकाळकर,दीपक वानखेडे, माजी महापौर नरेश गावंडे, रमण पैगवार, रमेश पुणेकर, दयाल जसनानी, अ‍ॅड.अक्षय समर्थ, अब्दुल शकील, किशोर गीद, बॉबी दहीवाले,अरविंद वानखेडे, मोतीराम मोहाडीकर, अण्णाजी राऊत, पंकज निघोट, वैभव काळे, महेश श्रीवास, पंकज थोरात, प्रसन्ना जिचकार, प्रभाकर खापरे, राहुल खापेकर, राजेद्र नंदनकर, विवेक निकोसे, इरशाद मलिक, सुनील दहीकर, अमित पाठक, कुमार बोरकुटे,रवी गाडगे पाटील, राजेश कुंभलकर, प्रा.अनिल शर्मा, इरशाद अली, प्रकाश बांते, किरण गडकरी, देवा उसरे, मिलिंद दुपारे, कमलेश लारोकर, लोहावेत गुरुजी, अजय नासरे, प्रशांत धाकणे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक आदी सहभागी झाले होते.रास्ता रोकोचा प्रयत्न धरणे आंदोलनादरम्यान नेत्यांची भाषणे संपल्यावर विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी एकाएक रास्ता रोको करण्यासाठी धाव घेतली. मात्र, पोलिसांनी आधीच संविधान चौकात रस्त्याच्या कडेला बॅरिकेडस् लावले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. रस्त्याकडे धाव घेणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरले. कार्यकर्त्यांनी बॅरिकेडस् तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांत खटकेही उडाले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत राफेल घोटाळ्याचा निषेध केला.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन