शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नागपुरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 8:52 PM

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनांतर्गत शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसने सोमवारी संविधान चौकात संयुक्तपणे धरणे-निदर्शने केली.

ठळक मुद्दे संविधान चौकात धरणे : इतर ठिकाणीही निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनांतर्गत शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसने सोमवारी संविधान चौकात संयुक्तपणे धरणे-निदर्शने केली. शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. पक्षाशी संबंधित इतर संघटनांनीही विविध ठिकाणी आंदोलन केले.

आज संपूर्ण जग कोविड-१९ शी संघर्ष करीत आहे. लाखो लोकांचा रोजगार हिरावला आहे. अशा वेळी केंद्र सरकारने दरवाढ करून नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मागील ७ जूनपासून रोज पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. पेट्रोल प्रति लिटर ९.१२ रुपये आणि डिझेल प्रति लिटर ११.०१ रुपयाने वाढवण्यात आले आहे, ही दरवाढ मागे घेऊन नागरिकांना दिलासा देण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात निदर्शने करीत नारेबाजी केली. आंदोलनात प्रदेश महासचिव मुन्ना ओझा, मुजीब पठाण, सचिव उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, सचिव अतुल कोटेचा, किशोर गजभिये, डॉ. गजराज हटेवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, शहाजा शेख, एस.क्यू.जमा, संजय महाकाळकर, संदेश सिंगलकर, वीणा बेलगे, नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन ग्वालबन्शी,मनोज सांगोळे, मनोज गावंडे, प्रशांत धवड, रश्मी धुर्वे, माजी नगरसेवक किशोर गजभिये, अल्पसंख्यक सेल अध्यक्ष इरशाद अली, वासुदेव ढोके, चंद्रकांत हिंगे, सेवादल अध्यक्ष प्रवीण आगरे, महेश श्रीवास, डॉ. मनोहर तांबुलकर यांच्यासह ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश पौनीकर, युवराज वैद्य, प्रवीण गवरे, दिनेश तराळे, मोतीराम मोहाडीकर, विश्वेश्वर अहिरकर, पंकज थोरात, पंकज निघोट,रजत देशमुख, प्रमोद ठाकूर, गोपाल पट्टम, देवेंद्र रोटेले, सुनीता ढोले, इरशाद मलिक,अब्दुल शकील, राजेश कुंभलकर, दिलीप गांधी,प्रशांत ढाकणे, मिलिंद सोनटक्के,धरम पाटील, रवी गाडगे पाटील,बॉबी दहीवले आदींचा समावेश होता.

सायकल रॅली काढली युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके व शहर अध्यक्ष तौसीफ खान यांच्या उपस्थितीत अक्षय घाटोळे व प्रज्वल शनिवारे यांच्या नेतृत्वात पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. बगडगंज येथील कापसे चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये इरफान काजी, वसीम शेख, राहुल बावरे, मनीष मारशेट्टीवार, ऋषभ धुळे, आकाश मल्लेवार,अभिषेक धोटे,विजय मिश्रा,रोहित मोटघरे, नितीन जुमळे, संदीप मस्के, हर्षल हजारे, शुभम कोहळे, मिथिलेश दुधनकर आदी सहभागी झाले होते.

 मुळक यांनी आकडेवारीच जाहीर केली माजी अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आकडेवारीच सादर करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, २०१९-२० मध्ये कच्च्या तेलाचे सरासरी मूल्य ६० डॉलर प्रति बॅरल होते. मार्चमध्ये ते ३३ डॉलर व एप्रिलमध्ये २६ डॉलरवर आले. पेट्रोलचे मूल्य कमी झाल्याने केंद्र सरकारला जवळपास ३ लाख कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित होते. परंतु सरकारने २० दिवस सलग पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली. ही वाढ अशा परिस्थितीत करण्यात आली आहे, जेव्हा लॉकडाऊनमुळे गेल्या तीन   महिन्यांपासून लोकांच्या हाताला काम नाही. सीएमआयईच्या अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे देशात जवळपास १२ कोटी लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा वेळी नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ करीत त्यांचे कंबरडे मोडले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसPetrolपेट्रोल