शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

काँग्रेसची पुन्हा तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई

By कमलेश वानखेडे | Updated: June 27, 2024 17:52 IST

Nagpur : विजय देवतळे, आसावरी देवतळे, विलास राऊत सहा वर्षांसाठी निलंबित

नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याच्या तक्रारींची दखल घेत प्रदेश काँग्रेसकडून कारवाई केली जात आहे. आता चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विजय देवतळे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आसावरी देवतळे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील विलास मारोतराव राऊत यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या संबंधीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी जारी केले आहे. याची माहिती संबंधित जिल्ह्यांच्या जिल्ध्ध्यक्षांना देखील कळविण्यात आली आहे. डॉ. आसावरी देवतळे यांनी २०१४ मध्ये वरोरा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. लोकसभेत त्यांनी पक्षविरोधी काम केल्याची तक्रार खा. प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांकडून करण्यात आली होती. या तक्रारीची प्रदेश काँग्रेसने दखल घेत कारवाई केली आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याबद्दलस्थानिक पातळीवरून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे स्वत: खातरमजा करीत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पडताळणी करून अहवाल मागवित आहे. यात दोषी आढळले तर तत्काळ कारवाई केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी कुणी पुढाकार घेऊ नये म्हणून प्रदेश काँग्रेसतर्फे आतापासूनच कठोर पावले उचलली जात आहेत.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसnagpurनागपूरYavatmalयवतमाळchandrapur-acचंद्रपूर