शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गोपनीय डाटा व कागदपत्रे लिक : महामेट्रोचे वरिष्ठ महाव्यस्थापक व ऑपरेटरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:48 AM

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करून गोपनीय डाटा आणि कागदपत्रे लिक करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून बुधवारी अटक केली. महामेट्रोमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे प्रकरण समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसदर पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करून गोपनीय डाटा आणि कागदपत्रे लिक करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून बुधवारी अटक केली. महामेट्रोमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे प्रकरण समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेवरा यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे बेवरा दुखावले होते. बृजेश दीक्षित दररोज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महामेट्रोच्या संचालकांसोबत बातचित करतात आणि नियमित कामासंदर्भात निर्देश देतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकरिता तांत्रिक कर्मचाऱ्यांची चमू नियुक्त केली आहे. या चमूत ऑपरेटर प्रवीण समर्थ होता. बेवराने प्रवीणला विश्वासात घेऊन दीक्षित यांच्यातर्फे त्यांच्याविरोधात करण्यात येणाऱ्या चर्चा रेकॉर्डिंग करण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीणने दीक्षित यांच्यातर्फे बेवरा यांच्या संदर्भात केलेली चर्चा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. त्याने हे रेकॉर्डिंग बेवरा यांना दिले.काही दिवसांपूर्वी बृजेश दीक्षित यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक क्लिपिंग प्राप्त झाली. त्यामध्ये दीक्षित एका संचालकासोबत बातचित करीत होते. क्लिपिंग ऐकून दीक्षित अवाक झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या चमूतील कुणीतरी लिप्त असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. या दिशेने चौकशी केली असता प्रवीणने बेवरा यांनी क्लिपिंग दिल्याची बाब कबूल केली. या आधारावर महामेट्रोचे अतिरिक्त व्यवस्थापक आशीष कुमार संघी यांनी सदर ठाण्यात तक्रार नोंदविली. सदर पोलिसांनी बुधवारी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून विश्वरंजन बेवरा आणि प्रवीण समर्थला अटक केली. नंतर दोघांनाही जामीन देण्यात आला आहे.

टॅग्स :Metroमेट्रोArrestअटक