शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

नागपुरात सदाबहार गीतांनी सजली ‘बिनाका गीतमाला’ ची मैफिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:38 PM

हिंदी सिनेमा संगीताच्या सुवर्ण काळातील सदाबहार गाणी आजही मनाला प्रसन्न करतात. रेडिओवर प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम अशा कर्णमधूर गीतांना रसिकांपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम ठरले होते. त्या सुवर्ण काळातील आठवणी ताज्या करणाऱ्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इंटेरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देगायकांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध : लोकमत सखी मंच व हार्मोनी इंटेरियर्सचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदी सिनेमा संगीताच्या सुवर्ण काळातील सदाबहार गाणी आजही मनाला प्रसन्न करतात. रेडिओवर प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम अशा कर्णमधूर गीतांना रसिकांपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम ठरले होते. त्या सुवर्ण काळातील आठवणी ताज्या करणाऱ्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इंटेरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हार्मोनी इंटेरियर्सच्या ऑनर नेहा पटेल व मेट्रोचे सहायक अभियंता गजानन निशानकर प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमतचे इव्हेंट मॅनेजर आतिश वानखेडे यांनी अतिथींचा सत्कार केला. यावेळी नेहा पटेल यांनी प्रेझेंटेशन दिले. १९५३ ते १९८५ या काळातील चित्रपटांची गाणी सहभागी गायकांनी सुमधूर आवाजाने सादर केली तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध झाले. किशोरदा, रफी, मुकेश, आशा भोसले व लता मंगेशकर अशा दिग्गज गायकांची गाणी या मैफिलीत सजली. कार्यक्रम पाहण्यासाठी सिव्हील लाईन्सचे वसंतराव देशपांडे सभागृह श्रोत्यांच्या गर्दीने फुलले होते.व्हॉईस ऑफ रफी म्हणून परिचित ज्योतिरामण अय्यर, व्हॉईस ऑफ किशोर म्हणून ओळख असलेले सागर मधुमटके तर अरविंद पाटील यांनी मुकेशच्या गीतांना स्वरसाज चढविला. यांच्यासह गुणी गायिका आकांक्षा नगरकर, श्रेया खराबे यांच्या स्वरांनीही श्रोत्यांना भुरळ पाडली. संगीत संयोजन राजेश समर्थ यांनी केले. प्रास्ताविक नेहा जोशी यांनी केले. शुभांगी रायलु यांनी संचालन केले.आगाज से अंजाम तक ‘वाह-वाह’लोकमतच्या व्हिडीओ क्लीपने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर श्रेया खराबे या गायिकेने ‘ये जिंदगी उसी की...’ या गीताने मैफिलीचा आगाज केला. पुढे ‘मेरा जूता है जापानी...’ सादर करून अरविंद पाटील यांनी टाळ्या घेतल्या. सुमधूर आवाज लाभलेले व्हॉईस ऑफ रफी ज्योतिरामण अय्यर यांनी श्रेयासह ‘ऐ दिल है मुश्किल...’ या युगुल गीताने समा बांधला. यानंतर अय्यर यांनी ‘जिंदगी भर नही...’, ‘तेरी प्यारी-प्यारी...’ ‘एहसान तेरा होगा...’, ‘बहारों फूल बरसाओ...’ अशा कर्णमधूर गीतांनी श्रोत्यांना झुमायला मजबूर केले. पुढे अय्यर यांनी आकांक्षा नगरकरसह ‘जो वादा किया वो...’ आणि ‘डफलीवाने डफली बजा...’ ही गाणी सादर केली.दुसरीकडे व्हॉईस ऑफ किशोर म्हणून परिचित सागर मधुमटके यांनी नेहमीच्या अंदाजात आकांक्षासमवेत ‘हाल कैसा है जनाब का...’ आणि श्रेयासोबत ‘अंग्रेजी में कहते हैं की...’ असे मस्तीभरे युगलगीत सादर केले. किशोर दा यांचा मस्तीभरा अंदाज सागर यांनी ‘खईके पान बनारस वाला...’ या गीतामधून दर्शविला. या गायक कलावंतांनी एकाहून एक सरस गाणी सादर करीत श्रोत्यांना मनसोक्त आनंद दिला. ‘शायद मेरी शादी का खयाल...’ या गीतासह आकांक्षा, सागर व संगीता सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाला सुंदर शेवटापर्यंत पोहचविले. रसभरीत गीतांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवले.

टॅग्स :Lokmat Sakhi Manch Nagpurलोकमत सखी मंच नागपूरmusicसंगीत