मेट्रो कोचेसची पॅकिंग पूर्ण :  चीनमधून भारतात रवानगीकरिता सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:41 IST2018-12-14T23:39:42+5:302018-12-14T23:41:47+5:30

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता चीनच्या सीआरआरसी डालियान प्रकल्पातून कोचेस निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोचेस जहाजाने चेन्नई येथे पाठविण्यासाठी पॅकिंग करण्यात आले आहे. सर्व कोचेस नागपुरात १५ जानेवारीपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पूर्वी चर्चेदरम्यान दिली होती.

Completed packing of Metro coaches: Ready to move from China to India | मेट्रो कोचेसची पॅकिंग पूर्ण :  चीनमधून भारतात रवानगीकरिता सज्ज

मेट्रो कोचेसची पॅकिंग पूर्ण :  चीनमधून भारतात रवानगीकरिता सज्ज

ठळक मुद्दे१५ जानेवारीपर्यंत नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता चीनच्या सीआरआरसी डालियान प्रकल्पातून कोचेस निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोचेस जहाजाने चेन्नई येथे पाठविण्यासाठी पॅकिंग करण्यात आले आहे. सर्व कोचेस नागपुरात १५ जानेवारीपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पूर्वी चर्चेदरम्यान दिली होती.
कोचेस भारतात येणाऱ्या जहाजात लोड करण्याच्या तयारीत आहेत. डालियान येथे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोचेसची निर्मिती करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरला चीनमध्ये सीआरआसीच्या अधिकाऱ्यांनी आणि बृजेश दीक्षित यांनी कोचेसला हिरवी झेंडी दाखविली होती. पण जहाज न मिळाल्यामुळे कोचेस निर्धारित वेळेत भारतात रवाना होऊ शकल्या नाही, अशी माहिती आहे. सर्व समस्यांवर मात करीत आता या कोचेस भारतात पोहोचण्याची प्रतीक्षा आहे. सर्व कोचेस नागपुरात पोहोचताच महामेट्रोच्या प्रगतीत आणखी महत्त्वाची भर पडणार आहे.

Web Title: Completed packing of Metro coaches: Ready to move from China to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.