CoronaVirus News : कोविड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:57 IST2020-08-17T03:04:08+5:302020-08-17T06:57:28+5:30
नागपुरात ५५ तर देशात ३७५ व्यक्तींना देण्यात आला असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे व कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

CoronaVirus News : कोविड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा डोस नागपुरात ५५ तर देशात ३७५ व्यक्तींना देण्यात आला असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे व कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
भारतीय औषध महानियंत्रकाने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला परवानगी दिल्यानंतर भारत बायोटेक, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखीत १२ सेंटरवर मानवी चाचणी सुरू झाली आहे.